अशी आहे रचना
दहा हजारांचा खर्च
दिवसभरात दीडशे अँपिअरची बॅटरी आठ तासांत
पूर्ण चार्ज होते. पवनचक्कीतून येणारा प्रवाह एसी प्रकारचा १८ होल्टपासून ५० व्होल्टपर्यंत
असतो. साधारण: एका तासात ३०० वॉट या दराने प्रवाह वाहतो. ही ऊर्जा २३० व्होल्टमध्ये
रूपांतरित झाल्यानंतर त्यावर घरातील ट्यूब, पंखे,
टीव्ही, मिक्सर अशी सर्व उपकरणे चालतात. यासाठी
सुमारे दहा हजार रुपये खर्च आल्याचे पाटील यांनी सांगितले.
टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती
पवनचक्की आणि त्याला लागणारी उपकरणे प्रत्येकाला
घरीच तयार करणे शक्य असल्याचे पाटील म्हणाले. त्यासाठी अडगळीत पडलेले पाइप चक्कीचे
ब्लेड बनविण्यास वापरात येतात. भंगारमध्ये पडलेले अँगल सहज उपलब्ध होतात. जुने बंद
पडलेले जनरेटर तांब्याच्या तारा आणि चुंबक वापरून सुरू करता येऊ शकते. या सर्वांची
योग्य रीतीने जोडणी केली, तर पवनचक्की
घरी तयार करू शकतो. ही साधने मिळाली, तर हा खर्च आणखी कमी करता
येऊ शकतो.
पाटील यांचे यशस्वी प्रयोग
संशोधक वृत्ती असलेल्या सतीश पाटील यांनी
आजवर अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी घशाच्या ऑपरेशनसाठी तयार केलेल्या "ब्रांकोस्कोप'ला पेटंटही मिळाले आहे. तसेच "इ-बॅग', जवानांसाठी
विशिष्ट प्रकारचे हेल्मेट, इलेक्ट्रॉनिक जॅक, कैरी फोडण्याचा विशिष्ट प्रकारचा सुडा, पीव्हीसी पाइपचा
तराफा असे प्रयोग यशस्वी करून दाखविले आहेत.
- पवनचक्कीमुळे वीजबिल निम्म्यावर
- आठ तासांत होते बॅटरी पूर्ण चार्ज
- दहा हजारांत तयार होते पवनचक्की
- टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती
- विजेवर चालतात सर्व उपकरणे
-------------
संशोधक सतीश पाटील
भ्रमणध्वनी क्रमांक : 9422618324
ई-मेल : astrosatish@gmail.com
सौजन्य : 
घरगुती पवनचक्की : टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती (सतीश पाटील निर्मित )
Reviewed by Sooraj Bagal
on
September 14, 2012
Rating:
No comments: