सॅमसंगने लॉन्‍च केला सर्वात मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी नोट-२

बर्लिन - सॅमसंगने जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन 'गॅलेक्सी नोट-२' लॉन्च केला आहे. सॅमसंगने हा नवीन स्मार्टफोन बर्लिन येथे आयोजित युरोपमधील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक शोमध्ये लॉन्च केला. 
काही दिवसांपूर्वी अँपलच्या पेटंटचे उल्लंघन केल्याचा खटला हरल्यानंतर सॅमसंगने हा पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार 'नोट २' च्या माध्यमातून या लढाईतील त्यांचे पारडे जड होण्यास मदत मिळेल. अ‍ॅपलने सॅमसंगच्या मोबाइल हँडसेटवर अमेरिकेत बंदी घालण्याची मागणी केली आहे, त्यामध्ये सॅमसंगच्या या गॅलेक्सी फोनचे नाव नाहीये.  'गॅलेक्सी नोट-२'चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा स्क्रीन सर्वात मोठा आहे. अँड्रॉइडच्या लेटेस्ट अपडेट जॅलिबीनसह येण्याची शक्यता. 5.5 इंच लवचीक (अनब्रेकेबल) स्क्रीन असेल.नवे ऑफलाइन आवाज पकडण्याच्या (व्हॉइस डिटेक्शन) वैशिष्ट्यामुळे प्रवासातही काम करण्याचा आनंद मिळणार. फोनची भाषा हिंदीच नाही, तर कन्नड, तेलगू, मल्याळमदेखील ठेवता येईल. जोडलेल्या 1000 डिव्हाइसपर्यंत एकाच वेळी संदेश पोहोचवला जाऊ शकतो.गॅलेक्सी नोट-२'चा स्‍क्रीन 5.5 इंच, 1280-800 पिक्सल रिझॉल्यूशन, 9.6 मिमी जाडी, वजन सुमारे 180 ग्रॅम, 12 एमपी रियर, 2 एमपी फ्रंट कॅमेरा, बॅटरीची क्षमता 2500 मेगाहर्ट्ज, स्‍पीड 2 जीबी रॅम (1.6 गीगाहर्ट्ज प्रोसेसर) वर हा स्मार्टफोन चालेले 'गॅलेक्सी नोट-२'ची किंमत 40,000 रुपयांपर्यंत असू शकते. याच दरम्यान सॅमसंगने कॅलिफोर्निया स्थित अ‍ॅपलच्या मुख्य कार्यालयात पाच सेंटच्या नाण्यांनी भरलेले ३० पेक्षा जास्त ट्रक पाठवले आहेत. जेव्हा हे ट्रक तेथे पोहचेले तेव्हा कंपनीच्या कर्मचा-यांना वाटले की, हे चुकीच्या ठिकाणी आले आहेत. काही मिनिटांनंतर अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांना सॅमसंगच्या सीईओचा फोन आला ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, मागील आठवड्यात कोर्टाने सांगितलेली दंडाची एक अब्ज डॉलर रक्कम या पद्धतीने देण्यात येईलसॅमसंगचे स्मार्टफोन मार्केटमध्ये 33% हिस्सा आहे, जो मागील वर्षी ते 17% होता.




सौजन्य  : 
सॅमसंगने लॉन्‍च केला सर्वात मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी नोट-२ सॅमसंगने लॉन्‍च केला सर्वात मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी नोट-२ Reviewed by Sooraj Bagal on September 02, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.