आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा?


गूगलने त्यांचं स्वतःचं ऑनलाईन शॉपिंग पोर्टल गूगल शॉपिंग आता भारतात उपलब्ध केलं असून ही सेवा आता वापरू शकतो. यामध्ये स्वतः गूगल वस्तू विकणार नसून भारतातल्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवर उपलब्ध असलेले डिल्स आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहेत. यात फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, शॉपक्लुज, क्लब फॅक्टरी, स्नॅपडील यांच्यासोबत कमी प्रसिद्ध असे अनेक वेबसाइट पर्याय इथे उपलब्ध आहेत! यामुळे गूगल शॉपिंगची स्पर्धा असेल असं म्हणता येणार नाही तर उलट याच्यामुळे सर्व विक्रेत्यांना एका प्लॅटफॉर्मवर वस्तू उपलब्ध करून देता येतील! एका वस्तूच्या विविध साईट्सवरील किंमती एकाच जागी पाहता येत असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणं सोपं होईल!


गूगल शॉपिंग द्वारे आपण ऑफर्सनुसार फिल्टर करून आपल्याला आवडेल त्या साईटवरील वस्तू घेऊ शकतो!
या सेवेत गूगल प्रत्येकाच्या आवडीनुसार वस्तू व त्यांच्यावरील ऑफर्स सुचवेल म्हणूनच ही सेवा गूगल लेन्स व गूगल अॅपसोबत जोडण्यात आली आहे! विविध प्रकार, विविध वेबसाईट यांची तुलना करून खरेदी करता येईल!

गूगल शॉपिंग चार प्रकारे वापरता येईल!
  • वेबसाईट : https://www.google.co.in/shopping 
  • गूगल लेन्सच्या स्टाईल सर्च द्वारे 
  • गूगल अॅपवर नव्या शॉपिंग टॅबद्वारे (प्रॉडक्ट सर्च केल्यावरच दिसणार)
  • Progressive Web App (PWA) द्वारे 

गूगल शॉपिंग विक्रेते आणि ग्राहक यांच्यामधील दुवा ठरेल जो या दोघांना एकमेकांशी जोडून देईल आणि उरलेला व्यवहार विक्रेत्याच्या वेबसाईटवर पूर्ण होईल! गूगलने यामध्ये स्थानिक दुकानांनासुद्धा संधी देणार असल्याचं सांगितलं आहे ज्यामुळे लहान व्याप्ती असलेल्या व्यापाऱ्यांनाही डिजिटल माध्यमावर विक्री सहज करता येईल! विक्रेत्याना गूगल शॉपिंगवर मोफत प्रवेश असेल!

गूगल लेन्समध्ये आपण एखाद्या वस्तूकडे आपला फोनचा कॅमेरा धरायचा, गूगल ती वस्तू ओळखून आपल्याला ती कोणत्या साईट्सवर मिळू शकेल अशी सर्व माहिती क्षणात उपलब्ध करून देईल! कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन्स, पुस्तके, घड्याळे, इ प्रकारची खरेदी गूगल शॉपिंग मार्फत करता येईल!

search terms google shopping now available in india will act as aggregator with support for google lens and app

आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा? आता गूगलची शॉपिंग वेबसाइट भारतात उपलब्ध! : अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा?  Reviewed by Sooraj Bagal on December 17, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.