चॅटिंगची आवड असलेल्या तरुणाईसाठी सॅमसंगने खास फोन सादर केला आहे. कंपनीचा गॅलक्सी चॅट बी 5330 आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. सॅमसंगने हा स्मार्टफोन यंदाच्या जुलै महिन्यात बाजारात आणलेला आहे. गॅलक्सी चॅट बी 5330 (Samsung Chat B 5330)मध्ये टच स्क्रीनसोबतच क्वार्टी की-पॅड देण्यात आला आहे. या फोनचा क्यूव्हीजीए डिस्प्ले 3.0 इंचांचा आहे. तसेच यात 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये 850 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर आणि 512 एमबीची रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी चॅटमध्ये ब्लूटूथ 3.0 आणि वायफायची सुविधा देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी यात एफएम रेडिओदेखील आहे. फोनमध्ये 4 जीबीची इंटरनल मेमरी असून, ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. गॅलक्सी चॅट बी 5330 ची रुंदी 11.7 मि.मी. असून, वजन 112 ग्रॅम आहे.
गॅझेट फंडा: सॅमसंगचा चॅट फोन ( स्वस्तात मस्त )
Reviewed by Sooraj Bagal
on
September 19, 2012
Rating:
No comments: