सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे


इंटरनेटचे दर आवाक्यात आल्याने आणि स्पर्धेमुळेमोबाइलच्या विशेषतः फीचर फोनच्या किमती कमी झाल्याआहेत त्यामुळे अनेक तरुणांच्या हातात अशा प्रकारचे फोन दिसू लागले आहेत साहजिकच एवढा मोठा ग्राहकवर्ग कशाला हातातून सोडायचा 

नफा थोडा कमी झाला तरी चालेल मात्र दीर्घकालीन ग्राहक मिळतील या हेतूने कंपन्यांनीदेखील स्वस्तातइंटरनेट प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत सोशल नेटवर्किंगचा वापर हा आता नेटवर्किंगपुरता राहिलेला नाही .विशेषतः तरुणांमध्ये अशा साइटची क्रेझ वाढली आहे काही प्रमाणात वरिष्ठही त्यातून सुटलेले नाहीत त्यामुळेएखादी गोष्ट शेअर झाल्याने पंचाईत होईल का याचीही फारशी काळजी घेतली जात नाही आयुष्यात घडेल तीगोष्ट अपवाद मग ती खासगी असो किंवा सार्वजनिक स्वरूपाची ती शेअर करण्याची हौस वाढत चालली आहे .त्यावरील अनेक कॉमेंटही अंगाशी येण्याची शक्यता नाकारली जात नसतानाही क्रेझी किया रे असेच काहीसेसोशल नेटवर्किंगबाबत झालेले आहे आज बायकोने अमूक एक भाजी केली होती असेच सोशल नेटवर्किंगसाइटवर शेअर झाले होते अर्थात त्याला सर्वच पातळीवरून कॉमटेंरूपी फोडणीचा तडका मिळाला अखेरपंचाईत झाली सोशल नेटवर्किंगवरून कोणती गोष्ट शेअर करावी याचे भान हरपून जात असल्याचे यातून पुढे येतआहे 

ब्रिटनमध्ये सोशल नेटवर्किंगवरून शेअर केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत पाहणी करण्यात आली सोशल नेटवर्किंगसाइटवरून शेअर होणारे फोटो हा तरुणांच्या काळजीचा विषय बनला आहे त्यांनी याबाबत मोठी चिंता व्यक्तकेली आहे आपले अनाकर्षक फोटो अपलोड होणार नाहीत ना हीच काळजी त्यांना अधिक लागली आहे एकाताज्या पाहणीनुसार दहापैकी चार तरुणांना याबाबत भीती वाटत आहे स्वतःचे अनाकर्षक फोटो आपले मित्रअपलोड तर करणार नाहीत ना याची काळजी महिलांमध्ये सर्वाधिक आहे ब्रिटनमध्ये फेसबुकचा वापर सरासरीएक तास वीस मिनिटे केला जातो मात्र त्यापेकी दहा टक्के जणांचा वापर हा दिवसाला आठ तासांहून अधिक आहेएकाच ड्रेसमधील फोटो दोन वेळा प्रसिद्ध झाल्यास अॅपिअरन्सवर परिणाम होण्याची भीती २५ टक्क्यांहूनअधिक जणांना वाटत आहे तसेच एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यास मित्र सोशल नेटवर्किंग साइटवरत्याबद्दल चर्चा करत असल्यास नैराश्य येते वा आपण लोकप्रिय नसल्याची खंत वाटते सोशल नेटवर्किंगमुळे नवीपिढी चिकित्सक होत चालली आहे असे मानसोपचारतज्ज्ञ ग्राहम जोन्स यांनी नमूद केले आहे त्यामुळेतरुणांमध्ये वाढलेल्या या सोशोमेनियाचे प्रमाण कमी व्हायला हवे .
सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे सोशल नेटवर्किंगने क्रेझी किया रे Reviewed by Sooraj Bagal on October 13, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.