विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला फोन : नॉचची कटकटच नाही!


अलीकडे स्मार्टफोन क्षेत्रात नावीन्य दिसणं कमी झालं आहे असं म्हणता म्हणता डिस्प्ले नॉच घालवून अधिक मोठा डिस्प्ले देण्यासाठी कंपन्या बऱ्याच नव्या डिझाइन्सचा प्रयोग करत आहेत यात आता विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला Vivo NEX Dual Editon फोन...! हा फोन काही महिन्यांपूर्वी सादर झालेल्या विवो नेक्सचीच नवी आवृत्ती म्हणता येईल. नॉच हटवायला कुणी त्याला थेंबाच रूप दिलं, काहींनी स्लायडर दिला, काहींनी मध्येच छिद्र पाडल्यासारख डिझाईन केलं काहींनी वॉलपेपर काळा रंगाचा देऊन लपवायचा प्रयत्न केला (अॅपल😶) आता विवोने मागे पूर्ण डिस्प्ले देऊन टाकला आहे!

या मागे दिलेल्या डिस्प्लेमुळे मुख्य कॅमेराद्वारेच सेल्फी काढता येतील! आता हे नवं डिझाईन किती ग्राहकांना आवडतं हे नंतर समजेलच...!


Vivo NEX Dual Display Specs  :
डिस्प्ले : 6.39-inch (2340×1080 pixels) Full HD+ Super AMOLED 19:5:9
मागील डिस्प्ले : 5.49-inch (1920×1080 pixels) Full HD Super AMOLED display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845
GPU : Adreno 630
रॅम : 10GB LPDDR4X
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 12MP Dual PD rear camera with dual-tone LED flash, Sony IMX363 4-axis OIS, f/1.79
+ 2MP night vision camera with f/1.8
फ्रंट कॅमेरा : -
बॅटरी : 3500mAh with 22.5W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.5 based on Android 9.0 (Pie)
इतर : 802.11 a/b/g/n/ac 2x2MIMO dual band Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB 2.0 Type-C
सेन्सर्स : In-display fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
किंमत : $724 (~५२०८०) (भारतीय किंमत नंतर सांगण्यात येईल)

विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला फोन : नॉचची कटकटच नाही! विवोचा दोन्ही बाजूला डिस्प्ले असलेला फोन : नॉचची कटकटच नाही! Reviewed by Sooraj Bagal on December 19, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.