इंटरनेटची साथ प्रगतीला

इंटरनेटमुळे मुले बिघडतात त्यांच्यावर वाइट संस्कार होतातलहान वयात त्यांना टेक्नॉलॉजी हाताळायला देऊ नये असे आपल्याकडे नेहमी बोलले जाते मात्र अमेरिकेत वॉशिंग्टन येथे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मुलांची प्रगती होते आणि त्यांची जबाबदारीची जाणीव वाढते असे दिसून आले आहे . ' स्व ची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कितपत उपयोग होतो यावर मात्र या सर्व्हेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे 

डिजिटल मीडिया च्या तज्ज्ञ आणि इन्फर्मेशन स्कूलमधील सहाय्यक प्राध्यापिका केटी डेविस यांनी ३२किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेतल्या १३ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेया सर्व्हेसाठी त्यांनी बर्मुडा बेट निवडले तेथील मुलांच्या टेक्नॉलॉजी हाताळण्याच्या सवयी अमेरिकेतील मुलांप्रमाणेच आहेत 

मित्रांशी संवाद साधण्यासाठी या माध्यमांचा वापर कशा पद्धतीने करता अशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारण्यात आले त्यांना जी उत्तरे मिळाली त्यावरून मोबाईल इंटरनेट यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि या मुलांना घडवण्यात या टेक्नॉलॉजीचाही बराच वाटा आहे याची जाणीव त्यांना झाली .९४ टक्के मुलांकडे सेल फोन आहेत त्यातील ५३ टक्के मुलांकडे इंटरनेट आहे ९१ टक्के मुलांचे फेसबुक प्रोफाइल्सआहे 

७८ टक्के जणांकडे एमएसएन ', ' एओएल किंवा स्काइप या ऑनलाइन इन्स्टंट मेसेजिंग सुविधा आहेत ९४टक्के मुले यू ट्यूब वापरतात आणि ९ टक्के मुले ट्विटर वापरतात या माध्यमांद्वारे ते नेमका कोणता संवाद साधतात याबद्दल डेविस यांनी मुलांना विचारले आणि त्यांच्या वेगवेगळ्या अशा दोनशे उत्तरांचे विश्लेषण केले .वैयक्तिक समस्या आणि एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते याविषयी फारसे बोलले गेले नाही 

होमवर्क आणि दिवसभरात आपण काय केले याविषयी मात्र बरेचसे बोलले गेले अशा प्रकारचे संभाषण मुलांचे दिवसभर चालते कॉलेज आणि जेवणाच्या वेळेला मात्र हा ऑनलाइन संवाद बंद असतो ६८ टक्के कम्युनिकेशन फेसबुकवरून चालते कुठला फोटो अपलोड केला आहे यू ट्यूबवर काय पाहण्यासारखे यांसारख्या संवादातून किशोरवयीन मुले कनेक्टेड राहतात ६९ टक्के मुले भावनिक गप्पा मारताना दिसतात त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे 

भावनिक गुंता सोडवण्यामागे आपला मित्र मैत्रीण आपल्याला मदत करेल अशी भावना त्यांच्यामध्ये असते .प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा डिजिटल कम्युनिकेशनच ही मुले अधिक पसंत करतात टेक्नॉलॉजीपासून आपण दूर जाऊ नये ,यासाठी ते सतत स्वतःला अपडेट ठेवतात या टेक्नॉलॉजीमुळे मुले बाह्यतः बरीच प्रगती करतील इतरांना ओळखायला शिकतील पण स्व ची अनुभूती अर्थात स्व ची जाणीव यांतून नेमकी किती तयार होईल हे मात्र आताच सांगता येणार नाही असे डेविस यांनी सांगितले नोव्हेंबरमधील अॅडॉल्सन्स या जर्नलमध्ये हे संशोधनप्रसिद्ध होणार आहे 



।।।-----------       महाराष्ट्र  टाइम्स  
इंटरनेटची साथ प्रगतीला इंटरनेटची साथ प्रगतीला Reviewed by Sooraj Bagal on October 30, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.