फेसबुकवरून मोफत कॉल?

एसएमएसपाठोपाठ फेसबुकने आता मोफत व्हॉइल कॉलिंगचीसुविधाही देण्याची तयारी सुरू केली आहे सध्या कॅनडातीलस्मार्टफोन युझर्सना ही सुविधा देण्यात येत आहे फेसबुक मेसेंजर अॅप अपडेट केलेल्यांना या माध्यमातून व्हॉइसओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल व्हीओआयपी सुविधा देण्यात येत आहे 

फेसबुकने तीन जानेवारीपासून अपडेट केलेल्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून जगभरातील युझर्सना व्हॉइस मेसेजपाठविण्याची सुविधा देऊ केली आहे या माध्यमातून व्हाइस मेसेज पाठविण्यासाठी बटन प्रेस केल्यानंतरव्हॉइस मेसेज पाठविण्याची सुविधा सुरू होते यात रेकॉर्ड बटन प्रेस ठेवल्यापासून रेकॉर्डिंग सुरू होते व त्याबटनावरून हात बाजूला केल्यास रेकॉर्डिंग बंद होते आणि मेसेज पाठवला जातो बोट स्लाइड केल्यानंतर मेसेजरद्द करता येतो याचबरोबर कंपनीने इंटरनेटवरून मोफत व्हॉइस कॉल देण्याचीही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीनेपावले टाकायला सुरुवात केली आहे सध्या कॅनडातील आयफोन युझर्सवर या सुविधेची चाचणी घेण्यात येत आहेत्यात अॅपवरील आय प्रेस केल्यावर फ्री कॉलचा पर्याय निवडता येतो फेसबुक या कॉलसाठी कुठलेही शुल्कघेत नसले तरी यासाठी युझरच्या डेटा प्लॅनमधील डेटा वापरला जातो त्यामुळे रूढार्थाने यासाठी कुठलेही शुल्कद्यावे लागत नसले तरी डेटा मात्र वापरला जातो आहे 
सध्या सुमारे एक अब्ज ७ लाख फेसबुक युझर्स असून त्यापैकी ६० कोटी यूझर्स मोबाइलवरून फेसबुक वापरतात .त्यातील सुमारे ४७ कोटी लोक अॅपच्या माध्यमातून फेसबुक वापरतात आणि उर्वरित फेसबुकची मोबाइल व्हर्जनवापरतात सुमारे १४ कोटी आयफोन युझर्स तर साडेचार कोटी आयपॅड युझर्स आयपॅडवरून फेसबुक वापरतात .त्यामुळेच सुरुवातीला कंपनीने त्यांच्यासाठी हे व्हर्जन चाचणीसाठी उपलब्ध करून दिले असावे असा अंदाज आहे

आगामी काळात फेसबुक व्हिडिओ मेसेजिंगची सुविधाही देईल अशी अपेक्षा आता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करूलागले आहेत पण पारंपारिक नंबरवरून कॉल करण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून फेसबुकच्या माध्यमातून कॉलकरण्याच्या नव्या प्रयत्नांसाठी ग्राहकांचे मन वळविणे मात्र कंपनीला कठीण जाईल अशी शक्यता वर्तवली जातआहे पण मोफत मिळणारी सुविधा पाहून ग्राहक याकडे आकर्षित होतील त्यामुळे भविष्यात कुणाचाहीमोबाइलनंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही थेट फेसबुक फ्रेण्ड्समधून संबंधित व्यक्ती शोधायचा आणि थेटकॉल करायचा 

फेसबुकवरून मोफत कॉल? फेसबुकवरून मोफत कॉल? Reviewed by Sooraj Bagal on January 20, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.