अँड्रॉइड धोक्यात येईल का ?


विंडोज ८  लॉचिंग अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत यामुळे अँड्रॉइड धोक्यात येईल का ग्राहक पुन्हा कम्प्युटर खरेदीकडे वळतील का विंडोजकडे पुरेसे अॅप्स आहेत का या प्रश्नांवर जगभरातील तज्ज्ञ चर्चा करत आहेत मायक्रोसॉफ्टसह गुगलचे भवितव्यच नव्या लाँचवर अवलंबून असल्याने या चर्चा होणे स्वाभाविक आहे अॅपलचे टॅबलेट मार्केटमधील स्थान मजबूत असल्याने त्यांचा याचा फरक पडणार नसला तरी सॅमसंग आसुस तोशिबा यासारख्या अँड्रॉइड टॅबलेट बनविणा या कंपन्यांनी विंडोज ८ टॅबलेटच्या निर्मितीची तयारी करून स्वतःचे स्थान डळमळीत होणार याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे 

आयपॅड नको असलेल्यांसाठी सध्या अँड्रॉइड टॅबलेटचा पर्याय उपलब्ध असला तरी त्याची विक्री म्हणावी तितकी नाही गेल्यावर्षी लॉँच झाला तेव्हा गॅलेक्सी टॅब १० १ हा आयपॅडला उत्तम टक्कर देईल अशी चर्चा होती मात्र अॅपल विरुद्धच्या खटल्यात सॅमसंगने नमूद केलेल्या माहितीनुसार अमेरिकत केवळ ७ लाख १२ हजार गॅलेक्सीटॅबची विक्री झाली आहे कंपन्यांनी निर्यात केलेल्या सर्व प्रकारच्या अँड्रॉइड टॅबलेट्सचे आकडे खूप मोठे दिसतअसले तरी कित्येक टॅब विक्रेत्यांकडे पडून असल्याचे आयडीसी या संशोधन संस्थेने म्हटले आहे 

विडोंज ८ मुळे अँड्रॉइड पूर्णपणे इतिहासजमा होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे प्रामुख्याने स्वस्तातीलआणि ७ ते १० इंच आकारात उपलब्ध असलेल्या नॉन ब्रँडेड अँड्रॉइड टॅबलेटच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे ग्राहक प्रामुख्याने गेम खेळणे व्हीडिओ पाहणे गाणी ऐकणे इंटरनेट अॅक्सेस यासारख्या गोष्टींसाठी अँड्रॉइड टॅबलेट वापरतील असे गार्टनरच्या कॅरोलिना मिलानेसी म्हणतात .हार्डवेअर उत्पादकांनी अॅपलच्या व्यतिरिक्त दुसरी कंपनी टॅबलेट निर्मितीस परवानगी देईल या आशेने अँड्रॉइडसाठी गुगलबरोबर करार केला होता मात्र आता त्यांनी मायक्रोसॉफ्टसोबतही हातमिळवणी केली आहे 

अँड्रॉइडचे एक बलस्थान म्हणून अॅप्सकडे पाहिले जाते सध्या गुगल प्ले स्टोअरवर ६ ७५ लाखाहून अधिक अॅप्सउपलब्ध आहेत त्याचवेळी मायक्रोसॉफ्टने अजून अॅप स्टोअरची घोषणा केलेली नाही मात्र विंडोजकडे अँड्रॉइडच्या कितीतरी पट अधिक अॅप्स असल्याचे तज्ज्ञ सांगतात गुगलनेही विंडोज ८ चा धोका लक्षात घेऊन आता अॅप्स डेव्हलपर्ससाठी नवे दिशानिर्देश जाहीर केले आहेत कारण हेच डेव्हलपर विंडोज ८ साठीही अॅप तयारकरणार आहेत 
अँड्रॉइड धोक्यात येईल का ? अँड्रॉइड धोक्यात येईल का ? Reviewed by Sooraj Bagal on November 03, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.