बदलत्या काळाबरोबर सर्वांनाच बदलावं लागतं. तंत्रज्ञानात तर हे बदल जरा लवकरच होतात. त्यामुळे एक बदल स्वीकारून त्याची सवय होत नाही , तोपर्यंत लगेच दुसरा बदल होतो आणि त्याच्यासह अॅडजस्ट करावं लागतं. बऱ्याचदा यूजर्सच्या सुविधेसाठी हे बदल केले जात असले तरी वारंवार बदल केल्याने सर्वसामान्यांचा गोंधळ हा होतोच.
फेसबुकने आता पुन्हा ले-आऊट बदलायचं ठरवलंय. टाइमलाइन , मेसेज यासारख्या गोष्टींचे लेआऊट कंपनी बदलणार असून प्रश्न टाकून सव्र्हे करण्याचे फिचर बंद करण्याचा प्रयत्न आहे. फेसबुकने सध्या टाइमलाइनच्या नव्या फॉरमॅटची चाचणी सुरू केली आहे. त्यात सर्व पोस्ट डाव्या बाजूला एका खाली एक असतील तर फ्रेंड्स , प्लेसेस ,अॅप्स आणि इतर गोष्टी स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसतील. त्यामुळे पोस्ट थोड्या मोठ्या आकारात दिसतील. तसेच रिसेंट अॅक्टिव्हिटी , फ्रेंड्स यासारख्या गोष्टी नसतील तर उजवी बाजू रिकामी दिसणार आहे. जागा आहे म्हणून त्याठिकाणी पोस्ट टाकल्या जाणार नाहीत. सध्याच्या ले-आऊटमध्ये पोस्ट उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला दिसत होत्या. त्यामुळे त्या पाहण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी युझर्सने केल्यामुळे फेसबुकने हे बदल करण्याचे ठरविले आहे. नव्या स्वरुपात टाइमलाइन आणखी सुटसुटीत दिसणार असल्याने गोंधळ कमी होईल ,अशी कंपनीला आशा आहे. नव्या टाइमलाइनमध्ये मात्र जुन्याप्रमाणेच तारखांचा बार उजव्या बाजूला वर दिसणार आहे. त्यामुळे यूजर्सला हव्या त्या महिन्यातील पोस्ट पाहता येतील.
फेसबुकवर प्रश्न टाकून मित्रमंडळीकडून त्यांची मते मागविण्याचे फिचर यूजर्समध्ये लोकप्रिय होतं. मात्र आता हे फीचर बंद करण्याचा प्रयत्न करून दुसरीकडे लक्ष केंद्रित करायचा कंपनीचा विचार आहे. यूजर्सच्या न्यूज फीडमधील हे फिचर काढून टाकण्याचा कंपनीचा विचार आहे. येत्या काही दिवसात हा बदल अमलात येणार आहे. मात्र फेसबुक ग्रुप आणि पेजेसवर हे फीचर उपलब्ध आहेत. तसेच यूजर्सना त्यांचे जुने प्रश्न अॅक्सेस करता येतील.
फेसबुकने मेल ऑप्शनमध्येही बदल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या नव्या फीचरमध्ये फेसबुक व्यतिरिक्त इतर यूजर्सही मेसेज पाठवू शकणार आहेत. तसेच त्यात फोटो , स्माईली टाकू शकणार आहेत. नव्या पर्यायात सर्च ऑप्शनही असणार असून त्यात नुकत्याच केलेल्या मेसेजमधून सर्च करता येईल. नव्या लेआऊटमध्ये लेटेस्ट मेसेज डाव्या हाताला दिसणार असून उजव्या बाजूला संपूर्ण मेसेज दिसणार आहेत.

फेसबुक बदलतंय...
Reviewed by Sooraj Bagal
on
November 17, 2012
Rating:
No comments: