भारतीय वंशाच्या संशोधकांची किमया
जगातील सर्वाधिक वेगवान आणि अचूक गणिती प्रक्रिया करणारा कम्प्युटर विकसित करण्यात आला असून , मानवी मनातील भावना आणि विचारांच्या माध्यमातून त्याची हाताळणी शक्य असल्याचा दावा भारतीय वंशाच्या संशोधकाने केला आहे . या विशिष्ट कम्प्युटरचा फायदा शारिरीकदृष्ट्या अपंगांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्टकेले .
अचूकता आणि गतिमानता यांच्या बरोबरीने नैसर्गिकरित्या चलनवलन ही या कम्प्युटरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत .स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मानवी मेंदूमध्ये बसविता येईल , अशी कृत्रिम प्रणाली निर्माण केली असून , ' रीफिट ' असे तिचे नामकरण करण्यात आले आहे .या प्रणालीसाठी आज्ञावलीदेखील
( अल्गोरिदम ) तयार करण्यात आली आहे . या प्रणालीच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या मानवी मज्जासंस्थेतून ( न्यूरल प्रोस्थेटिक ) कम्प्युटरच्या कर्सरवर नियंत्रण ठेवता येणार आहे .
' या प्रणालीच्या माध्यमातून शरीरावरील नियंत्रण हरवून बसलेल्या व्यक्तीदेखील सर्वसामान्यांनुसार कम्प्युटरची हाताळणी सहजरीत्या करू शकेल ,' असा विश्वास भारतीय वंशाचे संशोधक कृष्णा शेणॉय यांनी व्यक्त केला . ही प्रणाली मानवी मेंदूत बसविलेल्या सेन्सरद्वारे कार्यरत राहील . सेन्सरद्वारे होणारी प्रत्येक हालचाल अथवा कृती रेकॉर्ड करण्यात येईल . तसेच ती माहिती ' डेटा ' स्वरूपात कम्प्युटरकडे पाठविण्यात येईल , असेही शेणॉय यांनी नमूद केले .
या संशोधनासाठी शेणॉय यांना डॉ . विकाश गिल्जा यांनी सहकार्य केले . हे महत्त्वपूर्ण संशोधन ' नेचरन्युरोसायन्स ' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे .
विचार करा, कम्प्युटर चालवा
Reviewed by Sooraj Bagal
on
November 29, 2012
Rating:
No comments: