जीमेलचे 'स्पेस मॅनेजमेंट'

गुगल कंपनीच्या जीमेल या फ्री मेल सर्व्हिसने जागतिक पातळीवर फ्री ई मेलची व्याख्याच बदलून टाकलीहॉटमेल याहू यासारख्या मोफत ई मेल सुविधा देत असललेल्या कंपन्या गुगलच्या जी मेल या सर्व्हिसच्या तुलनेत मागे पडल्या 
                 कोणतीही ब्लिंग होणार ई मेलच्या पेजवर नसणारी अॅड भारंभार लिस्टिंग हे जी -मेलमध्ये नसल्याने आणि यावरून डेटा पाठविता येण्याची क्षमता यांच्यामुळे यूजर हळूहळू गुगल या कंपनीच्या 
जीमेल या सर्व्हिसकडे वळाले जागतिक पातळीवरील लोकांचा कल ज्याप्रमाणे  जीमेलकडे झाला तसाच काहीसा अनुभव भारतात आला आहे जी मेल ही फ्री ईमेल वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यूजरना जी मेलच्याबाबतीत काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न या गुगलकडून होतो कंपनीने जी मेलमध्ये नुकतेच मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली 

               त्यानुसार फाइल अॅटॅचमेंटची क्षमता २५ एमबीवरून १० जीबी करण्यातयेणार आहे . ' इंटिग्रेटेड गुगल ड्राइव्ह अंतर्गत ही सर्व्हिस मिळणार आहे या वाढीव क्षमतेमुळे नेहमीच्या तुलनेत४०० पटींनी अधिक मोठी असणारी इमेज अथवा फाइल पाठविणे शक्य होणार आहे याशिवाय पाठविण्यात येणारी फाइल क्लाउड मध्ये साठवून ठेवता येणार असून मेल अथवा प्राप्तकर्त्यालाही ते अॅक्सेस करता येणार आहे 
तसेच मिळालेल्या फाइलचे अपग्रेड व्हर्जनही मिळवता येणार आहे जी मेलवर १० जीबी मोफत स्टोरेज मिळत आहे सध्या जी मेलची किती स्पेस वापरत आहे याची माहिती साइन केल्यावर जी मेलच्या पेजच्या खालील बाजूस पहायला मिळते त्यानुसार आपल्याला किती डेटा ठेवायचा आहे आणि किती उडवायचा आहे किंवा त्याचा बॅकअप घ्याययचा आहे याची कल्पना यातून मिळते 
                     मात्र क्षमता पूर्ण झाल्यास काही मेजेस ट्रॅशमध्ये ढकलता येऊ शकतात आणि त्यानंतर कायमचे डिलिट करून स्पेस वाढविण्यासाठी वाट मोकळी करता येऊ शकते एखादा मेसेज ट्रॅशमध्ये ढकलायचा असल्यास तो सिलेक्ट करून किंवा तो ओपन करून डिलिट बटन दाबून संबंधित मेसेज ट्रॅशमध्ये पाठविता येतो 
एखदा मेसेज कायमचा डिलिट करायचा असल्यास संबंधित मेल इनबॉक्समध्ये सिलेक्ट करून डिलिटवर क्लिक करावे आणि त्यानंतर ट्रॅशमध्ये जाऊन डिलिट फॉरएव्हर या ऑप्शनला क्लिक करावे मात्र कायमचा डिलिट केलेला मेल पुन्हा मिळविता येत नाही १० जीबी व्यतिरिक्त आणखी स्पेस मेलसाठी आवश्यक असल्यास सेटिंगमध्ये गुगल स्टोरेज ट्रबल शूटिंग पर्याय आहे त्यावरून मेल पाठवून अतिरिक्त स्पेस घेता येऊ शकते मात्र ,ती विकत घ्यावी लागते गुगल कंपनीने जी मेलसाठी दिलेली १० जीबी ही स्पेस तशी मोठी आहे त्यामुळे तिचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास ही स्पेस पुरू शकते 

जीमेलचे 'स्पेस मॅनेजमेंट' जीमेलचे 'स्पेस मॅनेजमेंट' Reviewed by Sooraj Bagal on December 09, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.