लेनोवो या संगणक उत्पादनाच्या क्षेत्रातील कंपनीने आता भारतातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या या लिनोवो स्मार्टफोन्समध्ये लिनोवो ए६०+ ते प्रिमियम क्वाड -कोअर लिनोवो के ८६० यांचा समावेश आहे.
''स्मार्ट, वायरलेस तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या भारतात वाढत असून स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे. लेनोवो स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांना योग्य मोबदल्यात सेवा देऊ करत असून आम्हाला विश्वास आहे की, आमचे ग्राहक आमच्या उत्पादनाचा निश्चितच विचार करतील,'' असे लेनोवो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमर बाबू यांनी याप्रसंगी सांगितले. लेनोवोने चीनमध्ये केवळ पहिल्या १८ महिन्यांच्या कालावधीत स्मार्टफोन क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावल्याचा कंपनीचा दावा आहे.गीक, स्टायलिश, प्रोफेशनल आणि अॅफॉर्डेबल अशा चार प्रकारांमध्ये लिनोवोने हे स्मार्टफोन्स बाजारपेठेत आणले आहेत. दीर्घ काळ चालणारी बॅटरी तसेच ड्युअल सिम क्षमता हे लिनोवोच्या स्मार्टफोन्सचे वैशिष्टय़ असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. लिनोवोचे चार स्मार्टफोन्स हे अॅन्ड्रॉईड व्हर्जन चारवर आधारीत असून ए ६०+ स्मार्टफोन हे अॅन्ड्रॉईड व्हर्जन २.३वर आधारीत आहेत.या मॉडेलमध्ये ५ इंची डिस्प्ले असून अपेक्षेपेक्षा किंमत कमी आहे. मोठा स्क्रीन, ९.९ एमएम डिझाईन, दीर्घ काळ टिकण्याची बॅटरीची क्षमता आणि ड्युएल सीम क्षमता यामुळे एस ८८० च्या मदतीने तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टचा अनुभव अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. तसेच कुटुंब, मित्रपरिवार यांच्याशी संपर्कात राहतानाच ऑफिसचे कामही करू शकता. बाजारपेठेतील किंमत : रु. १८,९९९ /-
१.४ जीएचझेड क्वाड -कोअर स्मार्टफोन असून यात ७२० ७ १२८० पिक्सेल, ५ इंची आयपीएस डिस्प्ले असून त्यामुळे चांगली रंगसंगती अनुभवता येते. महत्त्वाचे म्हणजे याला ८ मेगापिक्सल कॅमेराही असून त्यात स्पेशल इफेक्ट्सची सोय देण्यात आली आहे. एडिटिंग पर्यायांसह ८ जीबी ब्रॉड मेमरी असून यामुळे हाय रिझोल्यूशनचे चित्रण साठवता येते.
बाजारपेठेतील किंमत : रु. २८,४९९/-
कमी किमतीमध्ये अनेक वैशिष्ट्ये देणारा फोन असे याचे वर्णन कंपनीने केले आहे. १ गिगाहर्टझ् प्रोसेसर, अँड्रॉईड २.३ ऑपरेटिंग सिस्टीम, ३.५ इंची स्क्रीन हे या फोनचे वैशिष्ट्य होते. सध्या हा स्मार्टफोन सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे.
बाजारपेठेतील किंमत : रु. ६४९९/-हे ४ इंची ड्युएल सीम मॉडेल तो बिझनेस फोन म्हणून बाजारपेठेत आणण्यात आला आहे. यात लिनोवो स्मार्ट एनर्जी तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे बॅटरी दीर्घ काळ टिकू शकते. पी ७०० आय मध्ये २८ तासापर्यंत टॉक टाईम मिळू शकतो आणि एकदा चाज्र्ड केल्यानंतर १३ दिवसांपर्यंत तो स्टॅण्डबाय राहू शकतो. १ गिगाहर्टझ् ड्युएल कोअर प्रोसेसर आणि ४ इंची आयपीएस डिस्प्ले हे या बिझनेस फोनचे वैशिष्टय़ आहे. पी ७००आयमध्ये व्यावसायिक आणि मल्टिमीडियाशी निगडीत गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे.
बाजारपेठेतील किंमत : रु. १२,४९९/-स्मार्टफोनची खरेदी करताना अलीकडे अनेक जण त्यामध्ये संगीताचा आनंद किती चांगल्या पद्धतीने लुटता येऊ शकतो, याचा अंदाज घेतात. भारतीय बाजारपेठेच्या बाबतीत तर हे मोठय़ा प्रमाणावर खरे आहे. त्यामुळेच लिनोवोने स्टुडिओ दर्जाचा म्युझिक फोन म्हणून एस ५६० हे मॉडेल बाजारात आणले आहे. यात डॉल्बी डिजिटल प्लस तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे आवाज अधिक चांगल्या क्षमतेने ऐकता येतो. एस ५६० मध्ये ड्युअल कोअर प्रोसेसर असून ४ इंची आयपीएस स्क्रीन आहे ज्याद्वारे व्हिडिओ आणि इतर चित्रण पाहाता येते. शिवाय यासोबत ५ मेगापिक्सेल कॅमेरा बसवण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १४,४९९

स्मार्ट चॉइस : लेनोवोचे मल्टिटच स्मार्टफोन्स
Reviewed by Sooraj Bagal
on
December 01, 2012
Rating:
No comments: