एखाद्या गोष्टीची सवय झाली , की नवे काही स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. इंटरनेटवर सर्च इंजिनचा वापर करण्याच्या झालेल्या सवयीमुळे दुसऱ्या कुठल्या प्रकारे एखादी गोष्ट शोधता येईल , याचा विचारही फारसा कुणाला शिवला नसेल. आपल्याला जे सर्च करायचे आहे , तो शब्द टाइप करून संबंधित वेबसाइटच्या लिंकवर जायचे आणि हवी ती माहिती घ्यायची , असे साधारण आपल्याला माहीत असलेले सर्चचे स्वरूप आहे. पण , ' फेसबुक ' ने या सर्च संकल्पनेला फाटा देत कुणी विचारही करणार नाही , अशा नव्या पद्धतीची टूल बनवली आहे.
या टूलद्वारे ' सर्च मेथड ' तर बदलणार आहेच ; पण सर्च करण्यामध्ये मोनोपॉली असलेल्या ' गुगल ' ला आणि इतर कंपन्यांच्या वेबसाइट्सना शह देण्याचाही त्यामागे प्रयत्न आहे. मंगळवारी या टूलचे अनावरण करण्यात आले. या टूलला ' ग्राफ सर्च ' असे संबोधण्यात आले आहे.
' फेसबुक ' चे सहसंस्थापक आणि मुख्य अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी या ' टूल ' चे महत्त्व सांगितले. ते म्हणाले , ' ग्राफ सर्च ' साठी वर्षभराहून अधिक काळ आम्हाला लागला. सोशल नेटवर्कमध्ये युझरना सर्च करता येणार आहे. फेसबुकवर कुठलीही माहिती शोधण्यासाठी अत्यंत नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदा काही हजार यूझरनाच ही सुविधा वापरायला मिळेल. हळूहळू ती इतर यूझरना दिली जाईल. '
टूलमध्ये नेमके काय ?
फेसबुक युझर त्यांच्या सोशल नेटवर्कमध्ये त्यांना हवे ते सर्च करू शकतील. त्यामध्ये त्यांना हव्या असलेल्या व्यक्ती, ठिकाणे , फोटो आणि त्यांना जे आवडेल , ते येथे सर्च करता येईल. एखादे हॉटेल आपल्या एखाद्या मित्राने 'लाइक ' केले असेल , तर हॉटेल म्हणून सर्च दिला , तर आपल्याला संबंधित हॉटेलचे डिटेल्स मिळतील. डेंटिस्ट ,जॉब आणि बरेच काही शोधण्यासाठी याचा उपयोग होईल. गुगलवरील सर्च आणि फेसबुकच्या सर्चमध्ये असलेला मूलभूत फरक म्हणजे फेसबुकवर सर्च केल्यानंतर वेबसाइट्सची भली मोठी यादी दिसत नाही. सोशल नेटवर्कद्वारेच हवे ते मिळाल्यामुळे युझर ' गुगल ' चा वापर कमी करण्याची शक्यता आहे. आपल्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीद्वारे सर्च करून मिळालेली माहिती ही गुगलवर स्वतंत्र सर्च करून मिळवलेल्या माहितीपेक्षा अधिक विश्वासार्ह असेल , असा दावा कंपनीने केला आहे.
सोशल नेटर्किंग पुरेसे
फेसबुकमधील ' डेटा ' सर्चसाठी पुरेसा आहे , या गृहितकावर ' ग्राफ सर्च ' ची निर्मिती केली आहे. मित्राला कुठले पार्क आवडते , त्यावरून आपण एखाद्या पार्कबद्दलची माहिती , त्याचे फोटो पाहून संबंधित उद्यानात जावे , की न जावे हे ठरवू शकतो. केवळ ' सोशल नेटवर्किंग ' पुरतेच फेसबुकवरील सर्च मर्यादित राहणार आहे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे हा सर्च पुरेसा ठरेल , असा कंपनीचा दावा आहे.

'फेसबुक'ची नवी 'सर्च क्रांती'
Reviewed by Sooraj Bagal
on
January 22, 2013
Rating:
No comments: