शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl)

web.jpgफेसबुक आणि ट्विटरने पुन्हा एकदा शेअरिंग ची सोयउपलब्ध करून दिली आहे त्यामुळे तरुण पिढीला नव्याशेअरिंगची सवय लागली आहे त्यामुळे दररोज कित्येक गोष्टीविविध लिंक्सच्या माध्यमातून शेअर केल्या जातात मात्रआता या अनेक लिंक्स शेअर करायचाही कंटाळा येतो लिंकशेअर तर करायचीय पण अनेक लिंक शेअर करायचा कंटाळाट्विटरवर तर १४० शब्दांची मर्यादा असल्याने आणखीनचप्रॉब्लेम होतो या समस्येवर सोल्युशन्स देणाऱ्या काहीवेबसाइट्स आहेत त्यात अनेक लिंक एकाचवेळी शेअर करतायेतात 


1. Bit.ly 

यूआरएल छोटी करून देण्याची सेवा देणाऱ्या वेबसाइट्समध्ये ही एक आघाडीची वेबसाइट यामध्ये तुम्हालासुरुवातीला इ मेल आयडी वापरून अकाऊंट तयार करावे लागते त्यानंतर तुम्ही यूआरएल अॅड करू शकता हीयूआरएल शेअर करताना शॉर्ट स्वरुपात दिसते याठिकाणी बंडल करून अनेक यूआरएल एकाचवेळी शेअरहीकरता येतात याठिकाणी युआरएल बरोबरच फोटो डॉक्युमेंट ई बुक अॅड करता येतात हे बंडल किंवा सिंगलयुआरएल तुम्ही फेसबुक ट्विटरवर शेअर करू शकता किंवा ई मेलही करता येईल 

2. BridgeURL 

यूआरएल शॉर्ट करण्यासाठी ही वेबसाइट bit.yl चीच मदत घेते पण तरी त्यासाठी कुठलंही अकाऊंट तयार करावंलागत नाही हा या वेबसाइटचा मोठा प्लस पॉइंट याठिकाणीही यूआरएलसाठी टायटल देऊन यूआरएल अॅडकरून थेट शेअर करू शकता एकापेक्षा अधिक यूआरएल बंडल केल्या असतील तर ओपन करताना त्या स्लाइड शोप्रमाणे दिसतात याठिकाणी अकाऊंटही तयार करता येते त्याचा उपयोग करून लिंक अॅड करता येतात काढूनटाकता येतात 

3. MinMu 

यूआरएल शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही आणखी एक वेबसाइट कुठलेही पाच नंबर टाइप करा ,टायटल द्या यूआरएल टाइप करा किंवा पेस्ट करा आणि जनरेट मेन्यूवर क्लिक करून तुम्ही शॉर्ट लिंक तयार करूशकता ही लिंक फेसबुक किंवा ट्विटरमध्ये पेस्ट करून शेअर करू शकता मात्र या हायपरलिंक नसल्याने कॉपी -पेस्ट करूनच काम करावे लागते ही या वेबसाइटची एक त्रुटी आहे याठिकाणी लॉगिनची सोय नसल्याने तुमच्यालिंक साठवून ठेवता येत नाहीत 

4. Fur.ly 

लिंक शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे केवळ यूआरएल टाइप करा सिक्युरिटीकोड टाइप करा आणि एंटर क्लिक केले की झाली तुमची शॉर्ट लिंक तयार या लिंकला तुमच्या सोयीचे टायटलदेण्याचीही पर्याय याठिकाणी उपलब्ध आहे या वेबसाइटवर तुमचे अकाऊंट असेल तर सिक्युरिटी कोड टाइपकरण्याचीही गरज नाही मात्र याठिकाणी ५ पेक्षा अधिक यूआरएल बंडल करायचे असल्यास थोडी अडचण होते .

शॉर्ट अँड बंडल लिंक (bit.ly, goo.gl) शॉर्ट अँड बंडल लिंक  (bit.ly, goo.gl) Reviewed by Sooraj Bagal on January 17, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.