गुगलला ७० लाख डॉलरचा दंड

अमेरिकेत इंटरनेटच्या खासगी वाय फायनेटवर्कमधून गुपचूपपणे बेकायदेशीर माहिती गोळा केल्याप्रकरणी ७० लाख अमेरिकन डॉलर्स दंड भरण्याचीतयारी गुगलने दर्शवली अमेरिकेतील ३८ राज्यांमध्ये अॅटर्नी जनरलसोबत हा करार केला 

माहितीची गोपनीयता राखण्याबाबत कर्मचाऱ्यांना कडक प्रशिक्षण देण्यास तसेच यूजर्सना वायरलेस नेटवर्कसुरक्षित करण्याविषयी जागरूक करण्याची मोहीम राबवण्यासही गुगलने मान्यता दिली गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूइमेजसाठी पॅनोरमा फोटो काढणाऱ्या वाहनांनी वायफाय इंटरनेटच्या असुरक्षित नेटवर्कमधून बेकायदेशीररित्याडेटा गोळा केल्याच्या वृत्तानंतर सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती गुगलनेस्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे नऊ देशांमध्ये समोर आले असे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हसी इन्फॉर्मेशन सेंटरनेस्पष्ट केले स्ट्रीट व्ह्यू वाहनांनी अमेरिकेत २००८ ते २०१० या काळात गोळा केलेला ईमेल पासवर्ड वेबहिस्ट्री आणि अन्य डेटा नष्ट करण्याचे आश्वासनही गुगलने दिले 

गुगलला ७० लाख डॉलरचा दंड गुगलला ७० लाख डॉलरचा दंड Reviewed by Sooraj Bagal on March 22, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.