स्टायलिश... ‘स्मार्ट टीव्ही'

आपल्याकडे सणासुदीचे विशेष महत्व आहे. याच सणासुदीच्या नि​मित्ताने हल्ली इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस घरी आणण्याचा ट्रेंड वाढीस लागला आहे. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसच्या बाजारात वर्षभर कायम मागणी असणारे टीव्ही अर्थात टेलिव्हिजन हे प्रमुख उत्पादन आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. हीच क्रांती टीव्हीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचली आहे.
 
TV.jpg
सध्याचा जमाना हाय डेफिनिशन अर्थात एचडी टीव्हींचा आहे. गळेकापू स्पर्धेच्या काळात आज बाजारात एकाहून एक सरस एचडी टीव्ही उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही एचडीटीव्ही खरेदीला जाणार असाल, तर अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यातील प्रमुख घटक म्हणजे डिस्प्ले'. पूर्वीच्या मोठ्या आकाराच्या, अ​धिक वजनाच्या आणि अगडबंब टीव्हींची जागा हलक्या आणि आकर्षक एलइडी टीव्हींनी घेतली आहे. सध्या बाजारात प्लाझ्मा ',पारंपरिक सीसीएफएल (कोल्ड कॅथोड फ्लुरोसेंट लँप) बॅकलिट एलसीडी आणि एलइडी (लाइट एमिटिंग डायोड) बॅकलिट टीव्हींची चलती आहे. त्यातही प्रामुख्याने एलइडी टीव्हींना अधिक पसंती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एलइडी टीव्हींची बाजारपेठ विस्तारत असून, बहुतांश कंपन्यांनी एलसीडी टीव्हींचे उत्पादन जवळपास बंद केले आहे. उत्पादकांच्या दाव्यानुसार एलइडी टीव्ही एनर्जी एफिशियंट आहेत. त्याचमुळे बाजारात उपलब्ध अन्य टीव्हींच्या तुलनेत त्यांची किंमत अधिक आहे. सध्या बाजारात केवळ एलजी आणि व्हिडीओकॉन या दोनच कंपन्या एलसीडी टीव्हींच्या निर्मितीत आहेत. अन्य कंपन्यांनी जवळपास या टीव्हींचे उत्पादन थांबविल्यात जमा आहे. 
मूलभूत फरक काय? 
प्लाझ्मा ', ' एलइडी आणि एलसीडी या तिन्ही प्रकारांमध्ये फरक काय असा नेहमीच प्रश्न टीव्ही खरेदी करताना पडतो. या तिन्ही प्रकारांना वेगवेगळे करण्यात प्रकाशमानता हा मुख्य घटक आहे. प्लाझ्मा 'टीव्हीमध्ये फॉस्फर्स हे स्वयंप्रकाशी मूलद्रव्य असते. त्यामुळे प्लाझ्मा टीव्हीच्या स्क्रीनवर त्याला उजळविण्यासाठी बॅकलाइटची आवश्यकता नसते. एलसीडी हाय डेफिनिशनमध्ये असणारे लिक्विड क्रिस्टल 'स्वयंप्रकाशी नसल्याने त्यांना उजळून टाकण्यासाठी बॅक्लाइटची आवश्यकता भासते. एलसीडी आणि एलइडीटीव्हींमध्ये हाच प्रमुख फरक आहे. 
कोणता टीव्ही घ्यावा? 
जर तुम्हाला उच्च दर्जाची स्क्रीन आणि पिक्चर क्वालिटी चांगली हवी असेल, तर सध्या एलइडी बॅकलिट एचडीटीव्ही शिवाय तरणोपाय नाही. त्यांची जाडी​ कमी असून, ते एनर्जी एफिशियंटही असल्याचा कंपन्यांचा दावा आहे. कमी आकार, एनर्जी एफिशियंट आणि अत्युच्च पिक्चर क्वालिटी या तीन वैशिष्ट्यांमुळे एलइडी बॅकलिट एचडीटीव्ही च्या किमती अधिक आहेत. एलइडी पेक्षा बजेट कमी असल्यास प्लाझ्मा टीव्ही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या टीव्हींना अधिक ऊर्जा लागते. जर, तुमचे बजेट फारच कमी असेल, तर तुम्ही 'सीसीएफएल अर्थात कोल्ड कॅथोड फ्लुरोसेंट लँप टीव्हीही घेऊ शकता. 


बाजारातील टॉप एलइडी टीव्ही 


व्हिडिओकॉन एलेना व्ही ५५५९१पीझेड 
फुल एचडी थ्रीडी टीव्ही 
किंमत : १,११,३९१ 
फीचर्स : थ्रीडी अॅक्टिव्ह शटर टेक्नॉलॉजी, ५५ इंची एलइडी डिस्प्ले, हाय डेफिनिशन पिक्चर क्वालिटी, अद्वितीय थ्रीडी इमेजेस. रिझोल्युशन : १९२० १०८० पिक्सेल, १.०६ बिलियन डिस्प्ले कलर्स, ऑटोमॅटिक इमेज ऑप्टिमायझेशन. 


एलजी ३२ एलइ ४६०० एलडी टीव्ही 
किंमत : ३२,५०० 
फीचर्स : एलजीचा अत्याधुनिक एलइडी, हाय स्क्रीन रिझोल्युशन, स्लिम आणि स्टायलिश पॅनेल, वेगवान यूएसबी लोडिंग, ३२ इंची एलइडी डिस्प्ले, रिझोल्युशन : १९२० १०८० पिक्सेल, तीन एचडीएमआय पोर्ट, १ यूएसबी पोर्ट, पेटंटेट क्लिअर व्हॉइस टेक्नॉलॉजी, इंटेलिजंट सेन्सर. 


सॅमसंग डी ८००० स्मार्ट टीव्ही 
किंमत : २, ४९, ९०० 
फीचर्स : अद्वितीय पिक्चर क्वालिटी​, एसएनएस इंटिग्रेशन, सुपर स्लिम पॅनेल, थ्रीडी विथ डेप्थ ऑफ फिल्ड कंट्रोल, ५५ इंची, होम थिएटरचा फील, आय वॉचिंग इमेज क्वालिटी, ब्ल्यू रे मुव्ही, अॅक्युवेदर अॅप, गुगल टॉक अॅप, सोशल हब, ट्विटर आणि फेसबुकची सोय, रिझोल्युशन : १९२० १०८० पिक्सेल, पर्सनल व्हिडीओ रेकॉर्डर, ऑटो व्हॉल्युम लेव्हलर. 


सोनी एक्सबीआर ८४ एक्स ९०० 
किंमत : १६,९९,९०० 
फीचर्स : थक्क करून सोडणारी पिक्चर क्वालिटी, व्हायब्रंट कलर आणि ब्राइड डिस्प्ले, रिझोल्युशन : १३६६ X७६८ पिक्सेल, दोन बिल्ट इन स्पीकर, पॉवर बास बूस्टर साउंड सि​स्टीम, ऑटो सिग्नल बूस्टर, एमपीइजी ऑइस रिडक्शन, नेटफ्लिक्स, पँडोरा, फोर के अल्ट्रा हाय डेफिनिशन, फ्रंट सराउंड थ्रीडी, फोर सब वूफर्स, ८४ इंच.

 
फिलिप्स फुल एचडी २२ पीएफएल ४५५६ 
किंमत : अंदाजे १२,४५० 
फीचर्स : एनर्जी एफिशियंट, फुल एचडी सपोर्ट, ब्राइट आणि क्रिस्प डिस्प्ले, स्लिम, लाइट, गुड कनेक्टिव्हिटी, चांगला शार्पनेस आणि कॉन्ट्रास्ट,रिझोल्युशन : १९२० १०८० पिक्सेल, २२ इंची, १२० हर्ट्झ परफेक्ट मोशन रेट, अॅडव्हान्स्ड एलइडी लाइटनिंग टेक्नॉलॉजी. 


तोशिबा ४० व्हीएल २० एलइडी 
किंमत : ६२,९९० 
फीचर्स : थ्रीडी, फुल एचडी सपोर्ट, लाइट सेन्सर, स्लिम डिझाइन, थ्रीडी व्हिज्युएल, अॅमेझॉन साउंड क्वालिटी, अॅक्टिव्ह थ्री डी पिक्चर, ४० इंची, रिझोल्युशन : १९२० १०८० पिक्सेल, थ्रीडी मु​व्हिज विथ बॅटरी ऑपरेटेड थ्रीडी ग्लासेस. 


मायक्रोमॅक्स एलइडी ३२के३१६ 
किंमत : २५,००० अंदाजे 
फीचर्स : चांगला रिझोल्युशन डिस्प्ले, स्लीक, ३२ इंची, गेम्स, इंटरनेट ब्राउजिंग, आणि अॅप्सची सुविधा, झिरो डॉट एलइडी पॅनेल, रिझोल्युशन : १३६६ ७६८. 



----- विहंग घाटे


स्टायलिश... ‘स्मार्ट टीव्ही' स्टायलिश... ‘स्मार्ट टीव्ही' Reviewed by Sooraj Bagal on April 24, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.