आपल्या हातात स्मार्टफोन आल्यापासून आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. खूप लोक आपलं शॉपिंगही या स्मार्टफोनच्याच माध्यमातून करू लागली आहेत. मोबाइलवर फक्त एक क्लिक करून , आपल्या घरात आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळत असेल तर ते कोणाला नको असेल ? त्यामुळे या एम शॉपर्सच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचं दिसून येतंय. बहुतांश कंपन्यांनी देऊ केलेलं स्वस्त थ्रीजी कनेक्शन आणि परवडण्याजोगे स्मार्टफोन यामुळे त्याचा वापर वाढला आहे. सर्वांना एम शॉपिंग करणं सोयीचं वाटू लागलं आहे.
' इबे इंडिया ' या ऑनलाइन शॉपिंग कंपनीने नुकतंच याबाबत एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार बहुतांश लोकांनी उन्हाळी खरेदीसाठी एमशॉपीचाच पर्याय स्वीकारला आहे. एप्रिल महिन्यात केलेल्या या सर्वेक्षणामध्ये १ हजार ३४५ ग्राहकांची पाहणी करण्यात आली. यात सहभागी झालेल्यांमध्ये ९२ टक्के ग्राहक पुरुष होते. त्यापैकी ३९ टक्के ग्राहक हे १८ ते २५ वर्ष या वयोगटातले तर ३१ टक्के ग्राहक २६ ते ३० वर्ष वयोगटातले होते. त्यामुळे खरेदीचं हे माध्यम तरुणांमध्ये किती लोकप्रिय होतं , हे समजतं. यापैकी ४९ टक्के मोबाइल शॉपर्स हे भारतातल्या छोट्या शहरातले होते. म्हणजे महानगरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये एम शॉपर्सचं प्रमाण अधिक आहे.
समर मोबाइल कॉमर्स सर्व्हेमधून समोर आलेली काही ठळक वैशिष्ट्यं...
- उन्हाची तीव्रता आणि दुकानांमधली गर्दी टाळण्यासाठी ५९ टक्के मोबाइल शॉपर्सनी आपल्या मोबाइलवरूनच वस्तूंची खरेदी करणं पसंत केलं.
- या ग्राहकांनी सनग्लासेस (४९ टक्के) , सुती कपडे (४३ टक्के) , टीज (३६ टक्के) , शॉर्टस (३४ टक्के) आणि टोप्या (१८ टक्के) अशी खरेदी करून उन्हाळ्यात ' कूल ' राहणं पसंत केलंय.
- मोबाइल शॉपर्समधला सर्वात आवडता रंग हा पांढरा असून ५६ टक्के ग्राहकांनी या रंगालाच पहिली पसंती दर्शवली आहे. त्यापाठोपाठ निळा (५० टक्के) , हिरवा (२२टक्के) , काळा (२० टक्के) आणि क्रीम (२० टक्के) अशी टक्केवारी आहे.
- आपल्या कुटुंबियांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी मोबाइल कॉमर्स शॉपर्स कपडे आणि फूटवेअर (४२ टक्के) घेणं सर्वाधिक पसंत करतात.
- उपकरणांच्या किमतींची तुलना करणं (७२ टक्के) ही मोबाइल शॉपर्सची सर्वात लोकप्रिय अॅक्टिव्हिटी होती.
- ४३ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी रात्रीच्या वेळी शॉपिंग साइट्सवर जाणं पसंत केलं.
- स्टोअर किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापूर्वी ६२ टक्के मोबाइल शॉपर्स नेहमी आपल्या फोनवरून किंमती मात्र तपासून पाहतात.
- मोबाइल शॉपर्स आपल्या आवडत्या शॉपिंग साइट्स अॅक्सेस करण्यासाठी ब्राऊजरचा (४६ टक्के) वापर करतात. २१ टक्क्यांहून अधिक शॉपर्स आपल्या मोबाइलवर अॅप्स आणि ब्राऊजर असा दोन्हींचा वापर करतात.
- ५७ टक्के ग्राहक थ्रीजी , ३२ टक्के टूजी तर केवळ ११ टक्के एज वापरतात.
- सॅमसंग हा सर्वात लोकप्रिय मोबाइल उपकरण (३९ टक्के) ब्रॅण्ड असून त्यापाठोपाठ नोकिया (१६ टक्के) आणि अॅपलचा (११ टक्के) क्रमांक लागतो. त्यानंतर इतर कंपन्या येतात.
Some Sites for mobile shopping :
1. m.flipkart.com
2. m.ebay.in
 मोबाइल शॉपिंग जोरात
 
        Reviewed by Sooraj Bagal
        on 
        
May 06, 2013
 
        Rating: 
      

No comments: