सॅमसंग कंपनीचा 'गॅलेक्सी नोट ५१०' हा टॅब्लेट अखेर भारतात विक्रीस उपलब्ध झाला आहे. त्याचा स्क्रीन ८ इंची आहे. मल्टीमीडियाचा अनुभव या टॅब्लेटमुळे अधिक समृद्ध होईल असे सॅमसंग या कोरियन कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे. थ्री जी सेवेस अनुकूल अशा या टॅब्लेटला अँड्रॉइड जेली बिन्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे व ती १.६ गिगॅहर्टझ कंप्रतेवर चालते. त्याचा क्वाड कोअर प्रोसेसर २ जीबी रॅम क्षमतेचा आहे. गॅलेक्सी नोट ५१० ची किंमत ३० हजार ९०० इतकी ठेवण्यात आली असून त्याची अंतर्गत मेमरी (स्मृती) १६ जीबी इतकी आहे. खिशात ठेवता येईल इतका लहान असा हा टॅब्लेट नव्या काळातील गरजा ओळखूनच तयार केला असल्याचे सॅमसँग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अध्यक्ष बी.डी. पार्क यांनी सांगितले.
सॅमसंग गॅलेक्सी नोट ५१० या टॅब्लेटचा २०, ३२ सें.मी.चा स्क्रीन मल्टी विंडो असून त्यावर एकाच वेळी अनेक अॅप्लीकेशन वापरता येतात. अनलिमिटेड नोटस, सुविधा यात मेमो, डायरी, मस्ट रिमेंबर लिस्ट यासह उपलब्ध आहे. एअरव्ह्य़ू, एस पेन, व्हिडिओ, इमेल, फोटो यांची प्रिव्ह्य़ू, एस प्लानर या सुविधांमुळे प्रत्यक्ष फाईल न उघडताही त्याचा वापर करता येईल. हा टॅब्लेट घेणाऱ्या व्यक्तीने कंपनीला एसएमएस पाठवला तर आभासी पाकिटात बारा हजार नाणी जमा होतील. माय सव्र्हिसेस अॅप डाऊनलोड केल्यावर ती कार्यान्वित होतील. स्ट्रिमिंग प्रिमियम मुव्ही, बॉलिवूड गाणी डाऊनलोड करणे, गेम खेळणे, यासाठी त्याचा वापर करता येईल. ही ऑफर खरेदीनंतर ३ महिन्यांच्या काळासाठी आहे. किंमत ३०,९०० रु.
सॅमसंग गॅलेक्सी नोट ५१०
Reviewed by Sooraj Bagal
on
May 26, 2013
Rating:

No comments: