'भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच' ' अॅपल ' कडून २०१४मध्ये ' आयवॉच '?

Apple.jpgआयपॅड च्या माध्यमातून टेक्नोसॅव्हींना उत्तमोत्तम गॅजेट्सची अनुभूती देणाऱ्या अॅपल तर्फे भविष्यात मनगटी घड्याळाप्रमाणे किंवा अॅक्सेसरीजप्रमाणे वापरता येईल, अशा उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

कंपनीचे सीईओ टिमोथी कुक यांनी मनगटावर मावेल, अशा आकाराच्या कम्प्युटर गॅजेटच्या निर्मितीचे आश्वासन दिले. 'गुगल निर्मिती करीत असलेल्या इंटरनेट लिंक्ड गुगल ग्लासची निर्मितीही आपल्याला खुणावत असल्याचेही कुक यांनी स्पष्ट केले. मात्र, गुगल ग्लास हे उपकरण प्रचंड विस्तारणाऱ्या गॅजेट मार्केट चा भाग होऊ शकत नसल्याचे वास्तवही त्यांनी बोलून दाखविले. 

अॅक्सेसरीजप्रमाणे वापरता येणारी गॅजेट ही भविष्यातील उपकरणांची नांदी ठरू शकते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांबरोबरच आगामी काळात नव्याने कंपन्या या उपकरणांच्या बाजारपेठेत उतरता येण्याचीही शक्यता कुक यांनी वर्तविली. या पार्श्वभूमीवर अॅपल मनगटावर बांधता येणाऱ्या उपकरणाची (ज्याचे नाव 'आयवॉच असल्याची बाजारात जोरात चर्चा आहे) निर्मिती करणार असल्याचे वृत्त आहे. गुगल ग्लास च्या लोकप्रियतेविषयी आताच काहीही बोलणे योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले. मात्र, गुगलच्या या उपकरणाला मिळत असलेली प्रसिद्धी पाहता २०१४मध्ये अॅपल ' ' आयवॉच बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. 

माझ्या पाहणीतील बरीचशी तरुण मंडळी मनगटी घड्याळे वापरत नाहीत, त्यामुळे अशाप्रकारची उपकरणे हाताला बांधून फिरण्याची शक्यता फारच कमी असल्याचे माझे मत आहे. कम्प्युटरसारखी उपकरणे हाताला बांधल्यानंतर त्याचा वापर करणे, जवळपास अशक्य आहे, असेही टिमोथी कूक यांनी नमूद केले. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंग मुळे अॅपल ला फटका बसल्याच्या वृत्ताचे कुक यांनी खंडन केले. 

काय आहे 'गुगल ग्लास'? 

हे चष्म्यासारखी रचना असणारे 'गुगल'चे उपकरण असून, त्यात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गेम, हवामानाचा अंदाज, बातम्या आणि इंटरनेटशी संबंधित सर्व सेवा वापरता येणार आहेत, असा 'गुगल'चा दावा आहे.



Related keywords :
Gadget
iWatch
Apple
Smartwatch
Google Glass
Tim Cook
new technology

'भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच' ' अॅपल ' कडून २०१४मध्ये ' आयवॉच '? 'भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच' ' अॅपल ' कडून २०१४मध्ये ' आयवॉच '? Reviewed by Sooraj Bagal on June 08, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.