महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा 'युट्यूब' झाला आठ वर्षांचा

जगातील सर्वाधिक गर्दीचे संकेतस्थळ म्हणजे युट्यूब. त्याने  मंगळवारी(ता.21) आठ वर्षपूर्ण केली. यूट्यूबचा प्रारंभ  मे 2005 मध्‍ये झाला. इंटरनेट युगात प्रत्येक मिनिटाला 100 तासांचा व्हिडिओ अपलोड केला जातो. या व्यतिरिक्त युट्यूबला प्रत्येक महिन्यात एक अब्ज युनिक व्हिज‍िटर्स भेट देतात. लोकप्रियता आणि भविष्‍यातील वाढ लक्षात घेऊन गुगूलने नोव्हेंबर 2006 मध्‍ये एक अब्ज 65 लाख डॉलरमध्‍ये युट्यूबची खरेदी केली होती. या सं‍केतस्थळावर जावेद करिम या यूजरने जावेद या नावाने पहिला व्हिडिओ अपलोड केला. त्याचे नाव 'मी अ‍ॅट द झू' असे होते. जावेद करिम हे युट्यूबचे सहसंस्थापक होते.


यूट्यूब, ही गूगलने महाजालावरती चलचित्र पहाण्यासाठी व दाखवण्यासाठी जनतेला दिलेली सुविधा आहे. जरी काही व्यावसायिक संस्था यूट्यूबच्या भागीदारीने आपल्या कार्यक्रमांच्या थोड्याफार चित्रफिती येथे चढवत असल्या तरी, मुख्यतः येथील बहुतेक सामग्री ही वैयक्तिक खातेधारकांनींच चढवलेली आहे. ही सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते.

Most watched Youtube Videos Ever : >>>>>>> Youtube Charts

महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा 'युट्यूब' झाला आठ वर्षांचा



महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा 'युट्यूब' झाला आठ वर्षांचा महिन्याला 1 अब्ज भेट देणा-या युझर्संचा 'युट्यूब' झाला आठ वर्षांचा Reviewed by Sooraj Bagal on June 03, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.