सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची झलक

दिवसेंदिवस मोबाइल फोनच्या बाजारात दाखल होणाऱ्या नवनवीन उत्पादनांमुळे किंमतीचा मुद्दा तसा बाजूलाच फेकला गेला आहे . सातत्याने घटणाऱ्या किमतींमुळे फीचरफोन आणि स्मार्ट फोन यांच्यातील सीमारेषा 
जवळजवळ पुसून टाकली आहे .
किमान किंमतीपेक्षा थोडा अधिक खिसा रिकामा करण्याची तयारी आणि ब्रँडचे दडपणझुगारले , की तुमच्या
पसंतीचा आणि बजेटमधील मोबाइल तुमचा होऊ शकतो . सध्या बाजारात नोकिया (मायक्रोसॉफ्ट ), सॅमसंग , अॅपल , एलजी , सोनी ,ब्लॅकबेरी आणि एचटीसी या ब्रँडेड कंपन्यांशिवाय अन्य कंपन्यांचेही तुलनेने स्वस्त
आणि हायब्रँडच्या जवळपास फीचर्स असणारे मोबाइल अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत .
सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची ही झलक ...

व्हिडिओकॉन ए २४ 
दिसायला देखणा .. ही व्हिडिओकॉन ए २४ची खासियतम्हणावी लागेल . स्लीम बॉडी आणि दोन रंगांतीलप्लास्टिक केस . याचा डिस्प्ले अधिक मोठा आहे . व्हॉइसकॉलचा दर्जा आणि ओव्हरऑल नेटवर्क कव्हरेज उत्तम आहे.

फीचर्स :
अँड्रॉइड ४ . २ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० *४८० पिक्सेल ),
१ . २ गिगाहर्ट्झ ड्युअल कोअर प्रोसेसर, २५६ एमबी रॅम ,
५१२ एमबी इंटर्नल मेमरी (३२जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते .)
रीअर कॅमेरा ३ . २मेगापिक्सल , फ्रंट व्हीजीए कॅमेरा ,
ड्युअल सिम ,वायफाय , ब्लूटूथ , १४५० एमएएच ( मिली अॅम्पिअर परतास ) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ७२० पी क्षमतेचे व्हिडीओ अत्यंत सुरळीत आणि विनाअडथळा चालतात .
हेडफोनवर ऑडिओ अत्यंत सुस्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकू येतात .

कमतरता : ३जी सपोर्ट नाही , फक्त २५६ एमबीची रॅम , कमी पिक्सेलच्या कॅमेऱ्यामुळे फोटोमध्ये शार्पनेस
कमी आढळतो .
कार्बन स्मार्ट ए २६ 
टचस्क्रीन , बॅक स्टेनलेस स्टील कव्हर आणि बॅकलाइट टच बटणामुळे कार्बन स्मार्ट ए २६चे सौंदर्य खुलते .

फीचर्स :
अँड्रॉइड ४ . १ , ५ इंचाची मोठी टचस्क्रीन ( ८५४ * ४८० पिक्सेल ),
१ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअलकोअर प्रोसेसर , ५१२ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी ( ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते .),
५मेगापिक्सेलचा रीअर कॅमेरा , १ . ३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ,
ड्युअल सीम , वायफाय , ब्लूटूथ , २०००एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास ) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ( १६ तास बॅटरी चालत असल्याचा दावा)

कमतरता : स्पीकर्सचा साउंड तुलनेने कमी , टेंपल रनसारख्या गेमसाठीच उपयुक्त ,
३जी सुविधा नाही , कमीवेगवान इंटरनेट आणि ब्राउजिंग , फोटोदेखील कमी पिक्सेलचे ,
व्हिडिओ परफॉर्मन्सही कमीच .

मॅक्स एएक्स ५० 
विविध टास्क , वेब ब्राउजिंग आणि अँग्री बर्डसारखे गेम खेळण्यासाठी उपयुक्त , बहुतेक सर्व ऑडिओ आणिव्हिडीओ फॉरमॅटसाठी उपयुक्त , ७२० पी क्षमतेच्या एचडी व्हिडीओसाठीही अत्यंत उपयुक्त , ५ इंचाच्या मोठ्यास्क्रीनमुळे टायपिंगचाही सुखद अनुभव

फीचर्स :
अँड्रॉइड ४ . ४ . २ , ५ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिक्सेल ),
१ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअलकोअर प्रोसेसर ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी ( ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते ),
५ मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा, फ्रंट व्हीजीए कॅमेरा , ड्युअल सीम ,
थ्रीजी , वायफाय , ब्ल्यूटूथ , २००० एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ,
किंगसॉफ्ट ऑफिस , निम्बुझ आणि ऑपेरा मिनी .

कमतरता : कमी क्षमतेचे आवाज ऐकण्यासाठीच ऑडिओची रचना , माइकची क्षमताही अत्यंत अल्प .

झोलो ए ५०० एस 
ब्लॅकबेरी झेड १० सारखी रचना , चांगला टचस्क्रीन , हँडसेटचा परफॉर्मन्सही अव्वल दर्जाचा ,
रेडलाइनरशसारखे गेम्स चांगल्या पद्धतीने खेळू शकता येईल , अशी रचना , एचडी दर्जाचे व्हिडीओ पाहतानाहीचांगलाअनुभव येतो .

फीचर्स :
अँड्रॉइड ४ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिक्सेल ),
१ . २ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअलकोअर प्रोसेसर , ५१२ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ४ जीबी , ५ मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा , फ्रंट व्हीजीएकॅमेरा ,
ड्युअल सीम , थ्रीजी , वायफाय , ब्लूटूथ , १४०० एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास ) क्षमतेची बॅटरी

इंटेक्स क्लाउड वाय २ 
अत्यंत सक्षम यूजर इंटरफेस , रिस्पॉन्सिव्ह टचस्क्रीन, अत्यंत खणखणीत म्युझिक प्लेबॅक, थ्रीजी वापरतानाबॅटरी ११ तास चालत असल्याचा कंपनीचा दावा, बजेट अँड्रॉइड फोन म्हणून सर्वोत्तम .

फीचर्स :
अँड्रॉइड ४ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिकेल ),
१ गिगाहर्ट्झ क्षमतेचा ड्युअल कोअरप्रोसेसर, ५१२ एमबी रॅम ,
 इंटर्नल मेमरी ४ जीबी ( ३२ जीबीपर्यंत वाढवता येणे शक्य ),
५ मेगापिक्सेलचारीअर कॅमेरा , १ . ३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा,
ड्युअल सीम, थ्रीजी, वायफाय, ब्लूटूथ , १५०० एमएएच( मिली अॅम्पिअर पर तास ) क्षमतेची बॅटरी .

लाव्हा थ्रीजी ४०२ 
पॉकेट फ्रेंडली फोन, सिलिकॉन केसमुळे चांगली ग्रिप मिळते. विविधरंगी डिस्प्लेमुळे दिसण्यास देखणा,थ्रीजीपी फॉरमॅटमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग शक्य, एमओव्ही अर्थात मध्यम दर्जाच्या मुव्हिज अडथळ्यांविना शक्य,
उच्च क्षमतेचे लाउडस्पीकर

फीचर्स : अँड्रॉइड ४ . २ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० * ४८० पिक्सेल ),
१ . २ गिगाहर्ट्झ ड्युअल कोअरप्रोसेसर , २५६ एमबी रॅम ,
इंटर्नल मेमरी ५१२ एमबी ( ३२ जीबीपर्यंत वाढविता येते .),
 ३ एमपी रीअरकॅमेरा , फ्रंट व्हीजीए कॅमेरा , ड्युअल सीम , वायफाय ,
ब्लू टूथ , १५०० एमएएच ( मिली अॅम्पिअर पर तास )क्षमतेची लिथियम आयन बॅटरी .

incoming earch terms:
kabonn, xolo, lava, intex, videocon, maxx android smartphones
cheapest smartphones under rs 7000,
सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची झलक सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची झलक Reviewed by Sooraj Bagal on October 06, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.