आपल्या स्मार्टफोन्सवरुन ट्विटर, फेसबुक यांच्यासारखी सोशल नेटवर्किंग अकाऊंट्स एकाचवेळी अपडेट करण्याची मुभा मिळाली तर... उत्तमच! सतत प्रत्येक अकाऊंटच्या अॅपवर जाऊन पोस्ट टाकणं म्हणजी तशी कसरतच असते. सध्या अॅप्सच्या मार्केटमध्ये असे काही अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यामधून एकाच वेळी बरेच सोशल नेटवर्किंग अॅप एकाचवेळी हँडल करता येतात... अशाच अॅपवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
'हूट-सूट'
हूट-सूट हा एक खूप सध्याच्या घडीला सर्वात प्रसिद्ध, लोकप्रिय सोशल मीडीया मॅनेजमेंट अॅप आहे. या अॅपचे वैशिट्य म्हणजे तुम्ही तुमचे फेसबूक, ट्विटर, लिंक्ड-इन, गूगल प्लस, फोरस्क्वेर आणि इतर अकाउंट्स एकत्र हताळू शकतात. याद्वारे तुम्ही तुमचे ट्विट, फेसबूक पोस्ट्स आणि इतर सोशल अपडेट्सचं आयोजन करू शकता. यासाठी मग एकदा फेसबुक, एकदा ट्विटरवर जाण्याची कसरत करण्याची आवश्यकता नाही. बरं या अॅपचं 'पेड' व्हर्जन घेतलं तर तुम्हाला 'मेजरमेंट सर्व्हिसेस' आणि अॅनालॅटीक्स स्वतः च्या अकाउंटवर सहज रन करता येतील. यात तुम्ही ट्विटरसाठी 'कीवर्ड्स सर्च' ही सेट करू शकता. जेणेकरून तुम्ही तुमच्या 'ट्रेनडिंग हॅश-टॅग'ला ट्रॅक करू शकाल आणि लोकांशी संवाद साधणे सोपे होईल.
सेसमीक नावाचे सोशल मीडीया मॅनेजमेंट अँप मार्च २०१३ मध्ये हूट-सूट ने विकत घेतले आणि आता हूट-सूट मध्ये अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
'ट्विट डेक'
ट्विट डेक हेदेखील मल्टीसोशल मीडिया अकाउंट्स हँडलकर अॅप आहे. 'हूट-सूट'
हे ब्राउजरमध्ये अॅक्सेस करता येतं; पण 'ट्विट डेक' तुम्हाला डेस्कटॉप
अॅप्लिकेशन म्हणून हार्ड-ड्राइव्ह वर इनस्टॉल करता येते. हे अॅप तुम्हाला
तुमच्या क्रोम ब्राऊजर, अँड्रॉइड आणि आयफोनमध्येदेखील वापरता येईल. यातही
तुम्ही तुमचे फेसबूक, ट्विटर, लिंक्ड-इन, गूगल प्लस, फोरस्क्वेर आणि इतर
अकाउंट्स एकत्र हाताळू शकतात.
'सोशल ऊम्फ'
'हूट-सूट' आणि 'ट्विट डेक' यांच्याच पंक्तीत बसणारे 'सोशल ऊम्फ' हेदेखील
एक मल्टीसोशअल मीडिया अकाउंट्स हँडलर अॅप आहे; पण याचा सर्वात मोठा
तोटा म्हणजे तुम्हाला 'कीवर्ड सर्च' आणि बरेचसे इतर फीचर्स प्रो वर्जन
विकत घेतल्यावरच मिळतात. यातही फेसबूक, ट्विटर आणि इतर अकाउंट्स हाताळू शकता.
'सोशल ब्रो'
इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे 'सोशल ब्रो' हे अॅप फक्त
मल्टीट्विटर अकाउंट्स हँडलर आहे. या अॅपचा सर्वाधिक फायदा उठवायचा असेल
तर तुम्हाला 'प्रोवर्जन' विकत घ्यावाच लागेल. त्यामुळे हा अॅप बिझनेस
कंपनीसाठी खूप चांगला आहे. यात तुम्हाला ईमेलअॅड्रेस इम्पोर्ट करून
त्यांच्या ट्विटर अकाउंट्सशी थेट कनेक्ट करता येते. असे बरेच इतर
फायदेदेखील तुम्हाला 'सोशल ब्रो' पुरवतो.
आपल्या स्मार्टफोन्सवरुन ट्विटर, फेसबुक यांच्यासारखी सोशल नेटवर्किंग अकाऊंट्स एकाचवेळी अपडेट करण्याची मुभा मिळाली तर... उत्तमच! सतत प्रत्येक अकाऊंटच्या अॅपवर जाऊन पोस्ट टाकणं म्हणजी तशी कसरतच असते.
बफर
हे ट्विटर, फेसबूक आणि लिंक्ड-इन या साइट्सवरील पोस्ट शेअर करण्यासाठी वापरला जातो. यात पोस्ट शेड्यूलिंग करता येते. यातही तुम्ही 'प्रो-व्हर्जन' विकत
घेतल्यास पाहिजे तेव्हा तुम्हाला पोस्ट्स शेअर करता येऊ शकतात. बफर हे
गूगल क्रोमच्या एक्सटेंशनमध्येदेखील उपलब्ध आहे.
'वन फीड'
अशा सगळ्या अॅपनंतर वनफीड हा एक वेगळा अॅप एक्सटेंशन गूगल क्रोम
स्टोरमध्ये उपलब्ध आहे. त्याला सोशल डॅशबोर्ड म्हणूनही ओळख आहे. हा
डॅशबोर्ड तुम्हाला तुमचे फेसबूक, ट्विटर, इनस्टाग्रामचे अपडेट्स एका
फीडमध्ये तुमच्या गूगल क्रोम विंडोमध्ये दाखवतो.
एकूणच आपले सोशलनेटवर्किंग अकाउंट वापरेणे फक्त एका विंडोमधून हाताळणे सोपे
झाले आहे. हे सोशल अॅप्स मित्र, मैत्रिणी, कार्यालयामधील ग्रपुशी कनेक्ट
ठेवतात. अनेक अकाऊंट्स एकाचवेळी अपडेट करत वेळही वाचवता येतो. सो लेट्स डाऊनलोड
पराग मयेकर

एकाचवेळी फेसबुक, ट्विटरचे हँडलिंग
Reviewed by Sooraj Bagal
on
March 22, 2014
Rating:
No comments: