गेल्या काही दिवसात तुमचे मोबाइल बिल अचानक वाढले आहे, तुम्ही न करताही तुमच्या फोनमधून एसएमएस जात आहेत, तुमच्या कॉलची हिस्टरी मोबाइलमध्ये दिसत नाही, असा काही अनुभव तुम्हाला आला असेल तर तुमच्या अँड्रॉइड फोनला व्हायरसची बाधा झाली नाहीना, हे एकदा तपासून पाहा.
कम्प्युटरवर व्हायरसचा हल्ला होणे काही नवीन राहिलेले नाही. आता स्मार्टफोनवरील हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहेत. अँड्रॉइडवर नुकताच आलेला डेंड्रॉइड हा व्हायरस घातक असल्याचे दिसले आहे. ट्रोजन श्रेणीतील हा व्हायरस स्वतःहून फोन ऑपरेट करू शकतो किंवा एसएमएस पाठवू शकतो. हॅकिंग, फिशिंगविरोधात कार्यरत असलेली भारतातील नोडल एजन्सी असलेल्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने अँड्रॉइड फोन युजर्सना 'डेंड्रॉइड' या नव्या व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे. या व्हायरसमुळे अँड्रॉइड फोनमधील जवळपास सर्वच वैयक्तिक माहितीशी 'तडजोड' होण्याची शक्यता आहे. डेंड्रॉइड नावाच्या टूलकिटपासून तयार करण्यात आलेले अॅप अँड्रॉइडला धोका पोहोचवत आहेत. यामध्ये अॅपसाठी लागणाऱ्या परवानग्यांमध्ये बदल केला जातो. त्यानंतर असे अॅप अँड्रॉइड फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यावर त्या फोनचे सर्व कंट्रोल चुकीच्या व्यक्तींच्या हातात जातात आणि फोनवर दुरूनही नियंत्रण मिळवता येते. अशाप्रकारे नियंत्रण मिळवलेल्या फोनवरील कॉल लॉग डीलिट होणे, कोणताही नंबर डायल होणे, एसएमएस वाचणे, अॅप्लिकेशन रन होणे, इमेज आणि व्हिडीओ अपलोड होणे, कॉल आणि ऑडिओ रेकॉर्ड होणे असे सारे युजर्सच्या न कळत होवू शकते.
स्वतःच्या फोनवर अशा व्हायरसची काही बाधा झाली आहे का हे चेक करण्यासाठी काही पर्याय सीईआरटीने सुचविले आहेत. त्यात कोणत्याही अविश्वसनीय ठिकाणाहून (उदा. अनोळखी वेबसाइट) अॅप्लिकेशन डाउनलोड न करणे, मोबाइल अँटिव्हायरसच्या साह्याने पूर्ण सिस्टीम स्कॅन करणे, सॉफ्टवेअरचे पॅच आणि अपडेट इन्स्टॉल करताना अँड्राइड डिव्हाइस व्हेंडरकडून उपलब्ध झाल्यावरच करणे तसेच डिव्हाइस इन्क्रिप्शन करणे तसेच एखादे अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याला कोणती परवानगी हवी आहे याची तपासणी करणे अशा काही उपाययोजना या संस्थेने सुचवल्या आहेत. तसेच डेटा युसेज, बॅटरी वापर, मोबाइल बिल्समध्ये होणारी अचानक वाढ यावर लक्ष देण्याची सूचना या संस्थेने केली आहे. याशिवाय अनोळखी वायफाय नेटवर्कपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण अशा ठिकाणांहून हे अॅप तुमच्या मोबाइलपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे या खबरदारी घेताना तुमच्या फोनचा सातत्याने बॅकअप घेणे कधीही सोयीचे आणि तुमच्या फायद्याचे.

डेंड्रॉइडपासून सावधान
Reviewed by Sooraj Bagal
on
March 28, 2014
Rating:
No comments: