‘नोकिया एक्स’वर इंटरनेट मोफत

‘नोकिया एक्स’वर इंटरनेट मोफतफिनलँडची आघाडीची मोबाइल हँडसेट निर्माती कंपनी नोकियाने मंगळवारी भारती एअरटेलशी करार केला आहे. त्यानुसार नोकिया एक्स स्मार्टफोन खरेदीदार एअरटेल असणार्‍या ग्राहकांना दर महिन्याला 500 एमबी थ्री-जी डाटा मोफत वापरास मिळणार आहे. ही ऑफर तीन महिन्यांसाठी आहे.  
 देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलशी झालेल्या कराराविषयी नोकियाने सांगितले, ज्या मंडळात एअरटेलची थ्री-जी सेवा नाही त्या सर्कलमध्ये टू-जी सेवा असणार्‍या ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. नोकिया एक्स हँडसेटमध्ये टाकण्यात येणार्‍या पहिल्या एअरटेल सिमकार्डवर ही ऑफर मिळणार आहे. तसेच 30 जून 2014 पर्यंत नोकिया एक्स हँडसेट खरेदी करणार्‍या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे. नोकिया एक्स हा अँड्रॉइड आधारित हँडसेट आहे. यासंदर्भात नोकिया इंडियाचे संचालक (मार्केटिंग) विरल ओझा यांनी सांगितले, जास्तीत जास्त ग्राहकांना जोडण्यासाठी आम्ही सातत्याने सहकार्‍यांच्या मदतीने प्रयत्न करत आहोत.  
० तीन महिन्यांपर्यंत दर महिन्याला 500 एमबी डाटा मोफत मिळणार   
० नोकिया एक्सच्या सध्याच्या आणि नव्या ग्राहकांसाठी उपलब्ध   
० 30 जून 2014 पर्यंत खरेदी करणार्‍या ग्राहकांना मिळणार लाभ  
० नोकिया एक्समध्ये टाकण्यात येणार्‍या पहिल्या एअरटेल सिमवर लागू  
० ज्या मंडळात एअरटेल थ्री-जी सेवा नाही तेथे टू-जीवर ऑफर मिळणार

‘नोकिया एक्स’वर इंटरनेट मोफत ‘नोकिया एक्स’वर इंटरनेट मोफत Reviewed by Sooraj Bagal on April 20, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.