सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस

तुम्हाला काही संशयित ई-मेल्स, लिंक किंवा ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स आल्यात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर तुमचे पासवर्ड तातडीने बदलून टाका. सायबरविश्वात हार्टब्लीड नावाच्या व्हायरसने प्रवेश केला असून, त्यामुळे पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर आणि अन्य महत्त्वाची गुप्त माहिती हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. म्हणून, भारतीय सायबर तज्ज्ञांनी सर्व इंटरनेट वापरकर्त्यांना सुरक्षेचा इशारा दिला आहे. 

हा व्हायरस खुल्या सिक्युअर सॉकेट लेयरवर (ओपन एसएसएल) हल्ला करतो. 'ओपन एसएसएल' हा ऑनलाइन यंत्रणेमधला सर्वांत महत्त्वाचा प्रोटोकॉल असून, माहिती सुरक्षित ठेवणे आणि माहितीचे इंटरनेटवर हस्तांतर करणे, यामध्ये तो प्रोटोकॉल महत्त्वाचे काम करतो. त्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची वैयक्तिक गुप्त माहिती, पासवर्ड आदी हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची भीती 'कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया'ने (सर्ट-इन) व्यक्त केली आहे. 'सर्ट-इन' ही हॅकिंग, फिशिंगशी दोन हात करणारी; तसेच भारताच्या इंटरनेट डोमेनशी निगडित सुरक्षा वाढवण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. या व्हायरसपासून धोका खूप जास्त धोका असून, सर्व असुरक्षित यंत्रणा या व्हायरसला बळी पडू शकतात, असा इशारा या संस्थेने दिला आहे. लाल रंगाचा 'एक्स' किंवा स्राव होणाऱ्या हृदयाचे चिन्ह असे संशयित मेसेज आधी येऊ शकतात आणि नंतर व्हायरसचा हल्ला होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

आपण काय करू शकतो? 

तज्ज्ञाशी संपर्क साधून 'ओपन एसएसएल'ची व्हर्जन '१.०.१जी' अशी अपग्रेड करून घ्यावी. 

अँटीव्हायरस, ऑपरेटिंग सिस्टीम, फायरवॉल सिस्टीम आदी वेळेवर अपग्रेड करून घ्यावे. 

ई-मेल, बँकिंग यंत्रणा; तसेच महत्त्वाच्या ऑनलाइन अकाउंटचे पासवर्ड वेळोवेळी बदलावेत.

सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस Reviewed by Sooraj Bagal on April 14, 2014 Rating: 5

2 comments:

  1. Use 10 characters in your password. And don't forget to use mixed (alphabets + numbers) password.

    ReplyDelete
  2. Thanks for replying ..that information is useful to readers

    ReplyDelete

Powered by Blogger.