फेसबूक लवकरच मोबाइलवर इंटरनेटविना

एकेकाळी तरुणाईला वेड लावणारे फेसबूक आता लवकरच मोबाइलवर इंटरनेटविना उपलब्ध होणार आहे. बीएसएनएलने आपल्या युझर्ससाठी विनाइंटरनेट आणि डेटा कनेक्टिव्हीटीशिवाय मोबाइववर फेसबुकची सुविधा दिली आहे. बीएसएनएल युझर्संना ही सुविधा हवी असल्यास ३ दिवसासाठी ४ रुपये, एका आठवड्यासाठी १० रुपये आणि महिन्याभरासाठी २० रुपये मोजावे लागतील. 




सरकारी क्षेत्र असणारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने या सुविधेसाठी युटोपिया मोबाइल (U2opia Mobile) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही सुविधा बीएसएनएलच्या पूर्व आणि दक्षिण झोनला लागलीच मिळाली आहे. तर, पश्चिम आणि उत्तर झोनसाठी देखील ही सुविधा लवकरच मिळणार असल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले आहे. 

या सुविधेमुळे युएसएसडी तंत्रज्ञानाच्या आधारे युझर फेसबूकवर आपलं अकाउंट लॉग इन करु शकतात, स्टेटस, मेसेज वाचू अथवा लिहू शकतात. तसेच फ्रेंड रिक्वेस्टही पाठविता येणार आहे. 

जवळपास सर्वच मोबाइल युझर युएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर करतात. जर आपण आपल्या मोबाइलवर * आणि # यांच्यामध्ये काही नंबर टाकून प्री-पेड बॅलन्स पाहिला तर आपणही युएसएसडी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 

फेसबूक लवकरच मोबाइलवर इंटरनेटविना फेसबूक लवकरच मोबाइलवर इंटरनेटविना Reviewed by Sooraj Bagal on June 09, 2014 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.