रिलायन्स जिओ ही मुकेश अंबानी यांनी बहुप्रतीक्षित टेलीकॉम कंपनीची सेवा 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आज झालेल्या Reliance AGM वार्षिक कार्यक्रमात मुकेश अंबानींनी स्वतः ही घोषणा केली. यावेळी त्यांनी अत्यंत स्वस्त असे प्लॅन्स ग्राहकांसमोर ठेवले असून सध्याच्या इतर कंपन्याच्या मानाने ह्या प्लॅन्सची किंमत अगदीच नगण्य आहे! जिओने किंमतीच्या बाबतीत अक्षरशः इतिहास रचला आहे म्हणावयास हरकत नाही!
जिओच्या घोषणेतील ठळक मुद्दे :
जिओच्या घोषणेतील ठळक मुद्दे :
- सर्व जिओ ग्राहकांना वॉइस कॉल्स पूर्णतः मोफत म्हणजेच कोणाशीही केव्हाही फोनवर बोला एकही रुपया न भरता !
- रोमिंग साठीसुद्धा कोणताही अतिरिक्त चार्ज नाही, देशभर रोमिंग मोफत!
- ५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर कॉल्स, इंटरनेट, SMS सर्वकाही मोफत !
- ब्लॅकआऊट डे (सण/शासकीय सुट्ट्या) दिवशी सुद्धा मोफत SMS ची सोय (इतर कंपन्या या दिवशी प्लॅन कोणताही असला तरी पैसे घेतातच!)
- सणादिवशी पूर्णतः मोफत एसएमएस
- एक GB इंटरनेट डाटा साठी केवळ ५० रुपये मोजा! तेसुद्धा ४G स्पीडमध्ये !
- विद्यार्थ्यांना तर ह्या प्लॅन्सवर आणखी २५% सूट
खालील तक्त्यात जिओचे प्लॅन्स दर्शवले आहेत -
![]() |
| Reliance Jio Internet Voice SMS Official Plans |
वरच्या फोटोमध्ये पाहू शकता की जिओच्या प्लॅन्सला नकार देणे ग्राहकांना किती अवघड जाईल!
अवघ्या ४९९ मध्ये ४GB डाटा सोबत रात्रीच्या वेळी पूर्णतः मोफत 4G इंटरनेट, हॉटस्पॉटवर 8GB डाटा, पूर्णतः मोफत कॉल्स आणि SMS ! सोबत सर्वच प्लॅन्समध्ये १२६० रुपयांचे जिओ अॅप्सची वर्गणी (ज्यामध्ये टीव्ही, व्हिडिओ गाणी इत्यादि पाहायला मिळतील!) तसेच जवळपास प्रत्येक प्लॅननुसार रात्री 4G डाटा पूर्णतः मोफत मिळेल!
अंबानींनी मार्च २०१७ पर्यन्त ९० % भारतीय जिओ नेटवर्कवर असतील असा दावा केला आहे. भारत सध्या मोबाइल ब्रॉडब्रॅंडमध्ये १५५ व्या स्थानावर असून टॉप १० मध्ये नेण्याचं उद्दीष्ट बोलून दाखवलं आहे! देशात "डाटा गिरी" सुरू करण्याचा मानस त्यांनी जाहीर केलाय!
देशातली बहुतांश शाळा, कॉलेज वायफायद्वारे जोडली जातील, काही शहरात 1Gbps स्पीड असलेल फायबर नेटवर्क बसवणार, बिल realtime(सद्यस्थितीनुसार) दिसेल
रिलायन्स जिओच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ : Reliance AGM

देशातली बहुतांश शाळा, कॉलेज वायफायद्वारे जोडली जातील, काही शहरात 1Gbps स्पीड असलेल फायबर नेटवर्क बसवणार, बिल realtime(सद्यस्थितीनुसार) दिसेल
रिलायन्स जिओच्या ह्या धडाक्यामुळे ग्राहकांसाठी नक्कीच चांगले दिवस आले असले तरी टेलीकॉम कंपन्याच धाबं दणाणल आहे. एयरटेल आणि आयडियाचे शेअर तब्बल ७ टक्क्यांनी पडले आहेत! याचा अर्थ आयडिया ने अंबानींच्या ४५ मिनिटाच्या भाषणादरम्यान २८०० करोडचा तर एयरटेलने ९८०० करोडचा मार्केट कॅप गमावला आहे! सध्या भारतात एयरटेलकडे सर्वाधिक ग्राहक आहेत त्यामुळे साहजिकच सर्वाधिक नुकसान यांचच होईल !याची परिणीती एकतर ह्या कंपन्या स्वतः प्लॅन्स कमी करण्यामध्ये होईल किंवा ह्या कंपन्या जिओविरुद्ध कोर्टात जाण्याचीसुद्धा शक्यता आहे!
मराठीटेकचं अँड्रॉइड अॅप आता गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड MarathiTech on Google Play
मराठीटेकचं अँड्रॉइड अॅप आता गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड MarathiTech on Google Play
रिलायन्स जिओ टेलीकॉम सेवा सादर
Reviewed by Sooraj Bagal
on
September 01, 2016
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
September 01, 2016
Rating:



धम्माल होणार... वाट लागणार आता आयडीया अन airtel ची. झकास रिलायन्स
ReplyDelete