गूगलने सादर केलाय नवा "पिक्सेल" स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी !

गूगलच्या #MadeByGoogle ऑक्टोबर कार्यक्रमात  काही नवीन उत्पादने सादर केली असून स्मार्टफोन्स, व्हीआर, AI, वायफाय अशा अनेक क्षेत्रात या उत्पादनांचा समावेश होतो. गूगल पिक्सेल स्मार्टफोन, गूगल होम, गूगल असिस्टंट, क्रोमकास्ट अल्ट्रा, गूगल वायफाय, डेड्रीम व्हीआर यांचं सादरीकरण काल पार पडलं.
या सर्वांमध्ये गूगल असिस्टंटवर गूगलने भर दिलाय हे स्पष्ट जाणवत असून त्याविषयीसुद्धा त्यांनी अनेक डेमो दाखवले.
आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया या सर्वांबद्दल माहिती...


गूगल पिक्सेल स्मार्टफोन :  गूगलची यापूर्वीची नेक्सस Nexus ही सुप्रसिद्ध सिरिज बंद करून गूगल नवी पिक्सेल सिरिज सुरू करत आहे. गूगलच्या नेक्सस सिरिजचं सर्वोत्तम वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळणारे अँड्रॉइड व्हर्जन अपडेटस! ज्यामुळे गूगल अँड्रॉइडचं कोणताही नवीन व्हर्जन सादर केल्यावर जगात सर्वप्रथम नेक्सस फोन्सवरच याचं अपडेट दिलं जात होतं! तेच आता या नव्या पिक्सेल सिरिजबाबत घडणार असून आताच हा फोन अँड्रॉइड 7.1 नुगट सोबत सादर होतोय! हा फोन HTC ने बनवला आहे.
हा फोन दोन रूपात आणि तीन रंगात सादर केला गेला असून ह्या फोन्समध्ये आजपर्यंतचा सर्वोत्तम कॅमेरा आणि परफॉर्मेंस असल्याचा दावा गूगलने केलाय. पिक्सेल आणि पिक्सेल XL ही दोन रूपं Quite Black, Very Silver, Really Blue या रंगामध्ये उपलब्ध होईल. या नावांमध्ये सुद्धा गूगलने गमतीशीर नवे देऊन अॅपलची चेष्टा केल्याच म्हटलं जातंय !
भारतात हे फोन्स १३ ऑक्टोबरपासून prebooking साठी खुले होतील आणि नंतर महिनाखेरीस शिपिंग सुरू होईल.
याविषयी लॉंच व्हिडिओ पहा : Introducing Pixel, Phone by Google

गूगल पिक्सेल फीचर्स :
• डिस्प्ले : 5.0 इंच FHD AMOLED at 441ppi 2.5D Corning® Gorilla® Glass 4
• प्रॉसेसर : स्नॅपड्रॅगन 821 Quad Core
• रॅम : 4 Gb
• स्टोरेज :  32 Gb / 128Gb
• मुख्य कॅमेरा :  12.3MP IMX378 1.55μm f/2.0 Aperture 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग
• पुढील कॅमेरा :  8MP IMX179 f/2.4 Aperture
• बॅटरी : 2,770 mAh battery
• फास्ट चार्ज : १५ मिनिट चार्ज केल्यावर तब्बल ७ तास चालेल !!
• इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, USB Type C. NFC
• किंमत :  Google Pixel 32GB ~Rs. 57,000
• किंमत :  Google Pixel 128GB ~Rs. 66,000

गूगल पिक्सेल XL फीचर्स : 
• डिस्प्ले : 5.5 इंच QHD AMOLED at 534ppi 2.5D Corning® Gorilla® Glass 4
• बॅटरी : 3450 mAh battery
• इतर सर्व फीचर्स पिक्सेल प्रमाणेच
• किंमत : Google Pixel XL 32GB ~Rs. 67,000
• किंमत : Google Pixel XL 128GB ~Rs. 76,000

गूगल डेड्रीम व्हीआर ( Daydream VR Viewer) :  व्हर्च्युअल रिअॅलिटी (आभासी वास्तव) क्षेत्रात जवळपास सर्वच कंपन्या आपापले VR व्यूअर सादर करत आहेत. गूगलने सुद्धा कार्डबोर्ड नावाचा पुठ्ठयाचा व्यूअर आणला होता आणि काही अंशी तो यशस्वीसुद्धा झालाय. पण Daydream VR बाबत जशा अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याच अनेकांच म्हणणं आहे! कारण हा जवळपास कार्डबोर्ड सारख्याच तत्वावर काम करतो! यामध्येदेखील आपला स्मार्टफोन ठेवायचा आणि हे आपल्या डोळ्यासमोर घालायच की आभासी दुनियेच्या सफरीला तयार ! ह्याच कुशन ही ह्याची एक खासियत आहे.  
Daydream VR सोबत एक छोटा कंट्रोलर गूगलने सादर केलाय जो आपल्याला VR मोडमध्ये फोन कंट्रोल करण्यास मदत करेल. यामध्ये विविध सेन्सर बसवले असून ज्यामुळे आभासी दुनियेत चित्रे काढण्याची कमाल करता येईल! 
याबाबत अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा -  Introducing Daydream View, VR Headset by Google

गूगल होम : गूगल होम हा आपला घरगुती मदतनीस म्हणा हवतर! हे छोटसं डिवाइस घरातल्या कोपर्‍यात ठेवायच आणि एमजी त्याच्याशी आपण जसा संवाद साधू तसतसा तो आपल्याला उत्तर देईल. गूगल असिस्टंटच्या मदतीने गूगलने हे खास स्मार्ट होम अंतर्गत बनवलेल उपकरण आहे. याची किंमत $129 (रु ~८५००) असेल. 
गूगल होम येणार्‍या काळातील Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर करतो आणि आपल्या प्रश्नांना उत्तरे देतो. घरातील स्मार्ट गोष्टी manage करतो जसे घरातील दिवे/लाइट बंद चालू करतो प्रखरता कमी/जास्त करणे, गाणी लावणे, त्यांचा आवाज कमी जास्त करणे, हवामानविषयी माहिती, गूगलला विचारेल त्या प्रश्नांची उत्तरे इत्यादि सर्व कमी गूगल होम करू शकतो!  गूगल होमची टक्कर अॅमेझॉनच्या एको Echo नावाच्या असिस्टंट सोबत असेल जो काही वर्षापूर्वी सादर झाला होता!

गूगल होम व्हिडिओ पहा : 
Google WiFi
गूगल वायफाय : गूगल वायफाय म्हणजे गूगलने सादर केलेले वायफाय राऊटर होत. राऊटर हे असं डिवाइस असत जे आपल्या नेटवर्क कनेक्शनचं वायफाय हॉटस्पॉट मध्ये रूपांतर करून एकापेक्षा जास्त डिवाइसवर इंटरनेट वापरण्याची/नेटवर्क जोडण्याची सुविधा देतं ! याची किंमत $129 असून गूगलने यासाठी खास ऑफर अंतर्गत तीन गूगल वायफाय एकत्रित घेतल्यास $299 मध्ये देण्याचं जाहीर केलय !
याबद्दल अधिक जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये : 
क्रोमकास्ट अल्ट्रा : तुमच्या स्मार्ट नसलेल्या टीव्हीला स्मार्ट बनवत त्यावर इंटरनेट वापरण्यासाठी/ व्हिडिओ पाहण्यासाठी/गाणी ऐकण्यासाठी/चित्रपट पाहण्यासाठी गूगलने क्रोमकास्ट सादर केलं होतं. हे डिवाइस टीव्हीच्या HDMI पोर्टला जोडून आपला फोन कनेक्ट करायचा आणि आनंद घ्यायचा चित्रपट, संगीत, मालिका, कार्यक्रम, इत्यादि. आणि या सर्वासाठी तुमचा फोनच रीमोट म्हणून काम करेल! याला भरपूर प्रतिसाद मिळाला असून यामधील तिसरं व्हर्जन क्रोमकास्ट अल्ट्रा या नावाने सादर केलं गेलंय. यामध्ये इथरनेट अडप्टर जोडता येतो, सोबतच 4K व्हिडिओ पाहण्याची सोय, आवाजासाठी डॉल्बी व्हीजनचा समावेश आणि वेगामध्ये जवळपास दुप्पट वाढ असल्याचा दावा केला आहे. याची किंमत $69 (रु. ~४५००) असेल.      
याबद्दल व्हिडिओ  पहा :  Introducing Chromecast Ultra
गूगल असिस्टंट :  काही दिवसापूर्वीच सादर झालेल्या गूगल अॅलो अॅपमध्ये गूगल असिस्टंट पाहायला मिळाला होता मात्र आता हा असिस्टंट/मदतनीस तुमच्या स्मार्टफोनवर कधीही केव्हाही कोणत्याही अॅपमध्ये देखील वापरता येईल! जसे की आपण याला ऑक्टोबर मधील ट्रीपचे फोटो दाखव म्हटल्यास तो बरोब्बर शोधून त्या ट्रीपमधील सर्व फोटो दाखवेल. रीमेंडर लाव, हॉटेलमध्ये सीट बुक कर, हवामान काय आहे?, विमानाचा स्टेटस काय आहे?, स्पॅनिश भाषेत हॅलो कसे म्हणायचे?,इ सर्व कामे गूगल असिस्टेंट करू शकतो !      
गूगल असिस्टंट व्हिडिओ :  Meet your Google Assistant, your own personal Google

वरील सर्व प्रोडक्टस बद्दल जाणून घ्या ह्या लिंकवर : madeby.google.com

आम्ही ह्या सर्व कार्यक्रमाबद्दल फेसबुक पेजवर लाईव्ह माहिती देत होतो, त्यामुळे इथून पुढे अशा कार्यक्रमांबद्दल सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी फेसबुक पेजला लाइक करा 
मराठीटेक फेसबुक : www.facebook.com/marathitechblog

Incoming Search Terms : Google October Pixel XL Home Assistant Wifi Chromecast Ultra Daysream VR 

गूगलने सादर केलाय नवा "पिक्सेल" स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी ! गूगलने सादर केलाय नवा "पिक्सेल" स्मार्टफोन आणि इतर भन्नाट गोष्टी ! Reviewed by Sooraj Bagal on October 06, 2016 Rating: 5

2 comments:

  1. Good day! I know this is kinda off topic howeverr ,
    I'd figured I'd ask. Would you be interested in trading linkss or
    maybe guest authoring a blog post or vice-versa?
    My blog goes over a lot of the same subjects as ykurs and
    I thimk we could greatlyy benefit from each other.
    If you might be interested feel frwe to send me an e-mail.
    I look forward to hearing from you! Great blog by
    the way!
    http pengumuman snmptn 2016 ac id

    ReplyDelete
  2. video saint loco
    biodata cemal faruk lengkap
    teuku rassya anak dari
    http://tinyurl.com/y9rljwd6 verrell bramasta beragama
    http://tinyurl.com/y7cbor86 atiqah hasiholan ibunda
    bebi romeo judika
    http://tinyurl.com/ya2xge7e rano karno film dan acara tv

    ReplyDelete

Powered by Blogger.