प्लॅस्टिक मनी म्हणजे काय

प्लॅस्टिक मनी म्हणजे अशा प्रकारच चलन जे प्लॅस्टिक कार्डच्या रूपात बनवलं आहे व छापील नोटांच्या ऐवजी वापरलं जातं. प्लॅस्टिक मनीचं आपण रोज पाहतो ते रूप म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. छापील नोटांच्या नंतर चलनामध्ये बदल घडवून आणला तो थेट प्लॅस्टिक मनीनेच. यामुळे मोठी रोख रक्कम घेऊन फिरण्याची तितकी गरज उरली नाही. भारतात हे पर्याय बर्‍याच वर्षापासून उपलब्ध झाले असून अलीकडे यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

प्लॅस्टिक मनी खालील प्रकारात उपलब्ध आहे : 
1. डेबिट कार्डस 
2. क्रेडिट कार्डस      

1. डेबिट कार्डस : ह्या प्रकारच्या कार्डसना आपण Prepaid कार्डस म्हणू शकतो. कारण डेबिट कार्ड वापरण्यासाठी बँक खात्यामध्ये मध्ये रक्कम जमा केलेली असावी लागते. हे कार्ड बँक खात्यामध्ये शिल्लक रक्कम असेपर्यंतच वापरता येते.  डेबिट कार्ड द्वारे विक्रेत्याकडे व्यवहार करताना कार्ड वापरल्यावर खातेधारकाच्या बँक खात्यामधून विक्रेत्याच्या खात्यात थेट जमा होते! 

2. क्रेडिट कार्डस : ह्या प्रकारच्या कार्डसना आपण Postpaid कार्डस म्हणू शकतो. कारण ह्यामध्ये आपण आधी व्यवहार करून नंतर महिनाखेरीला पैसे बँकेत भरतो. यासाठी बँक खात्री करून खातेधारकाला एक मर्यादा घातलेलं क्रेडिट कार्ड देते ज्याद्वारे तो कधीही मर्यादेपर्यंत खरेदी करू शकतो. खरेदीवेळी बँक खातेधारकाच्या वतीने पैसे जमा करते व नंतर महिनाखेरीस बँक बिल पाठवते ज्यानुसार खातेधारक ती रक्कम बॅंकमध्ये जमा करतो. 

क्रेडिट आणि डेबिट कार्ड मधील साम्य
सर्व कार्डस प्लॅस्टिकचे बनवलेले असतात व यामध्ये स्ट्रिप/पट्टी बसवलेली असते. 
सर्व कार्डस बँकातर्फेच पुरवली जातात  
सर्व कार्डस सामान्य व्यवहार जसे की पैसे काढणे, पैसे ट्रान्सफर, ऑनलाइन पेमेंटसाठी वापरता येतात. 
कार्ड वापरण्यासाठी वार्षिक फी आकारली जाते.  

क्रेडिट आणि डेबिट कार्ड मधील फरक : 
क्रेडिट कार्ड पोस्टपेड स्वरूपाच | डेबिट कार्ड प्रीपेड स्वरूपाचं असतं 
क्रेडिट कार्डची मर्यादा बँकने निश्चित करते | डेबिट कार्डची मर्यादा खात्यामध्ये रक्कम शिल्लक असेपर्यंत 
क्रेडिट कार्डची बिल दरमहिन्याला भरावच लागते | डेबिट कार्डला कोणत्याही प्रकारच बिल नाही 
क्रेडिट कार्डवर ठराविक कलावधीत पैसे भरले नाही तर व्याज | डेबिट कार्डवर व्याज आकारणी नसते     

क्रेडिट व डेबिट कार्डसचा उपयोग
एटीएममधून पैसे काढण्यासाठी/भरण्यासाठी 
खरेदी करण्यासाठी  (By POS Machines)
ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी (सर्व प्रकारचे व्यवहार जसे की रीचार्ज, तिकीट आरक्षण, बिल भरणा,इ)
VISA व Mastercard म्हणजे काय ? : या दोन केवळ पेमेंटच्या पद्धती आहेत. ह्या पद्धतींच्या नेटवर्कमधून व्यवहार केले जातात. ज्यामुळे व्यवहार सुरक्षित होतात. वरकरणी VISA आणि Mastercard यांच्यात काहीही फरक नाही. दोन्हीमध्ये केवळ स्पर्धात्मक ऑफर्स किंवा सुविधा यांच्यात थोडाफार फरक असतो बाकी अलीकडे सर्वच ठिकाणी दोन्ही पद्धती उपलब्ध असतातच. त्यामुळे ग्राहकांना थेट परिणाम होईल असा फरक नाहीये.
संस्था असून या संस्थांचा प्रत्यक्ष कार्डनिर्मितीत सहभाग नसून केवळ व्यवहारांना सुरक्षित मार्ग दाखवणे हे यांचे काम आहे. 
भारतामध्ये VISA, Mastercard, Maestro, RuPay कार्ड बँकातर्फे खातेधारकांना दिले जातात. RuPay पद्धत भारताच्या NCPI(National Payments Corporation of India) संस्थेने जाहीर केली आहे!
VISA card आणि प्रवासाचा विजा(Visa- जो शक्यतो विमानप्रवासासाठी दिला जातो) यांचासुद्धा काहीही संबंध नाही!  
आंतरराष्ट्रीय कार्डस : ह्या कार्डस द्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहार करता येतात जे नेहमीच्या कार्डसद्वारे शक्य नसतं. बँकाच्या निर्बंधामुळे यासाठी वेगळे कार्ड मागवावे लागते. जे नंतर तुम्ही Paypal सारख्या पेमेंट पद्धतीला वापरू शकता. खासगी बँका यासंदर्भात आघाडीवर आहेत (HDFC, Axis, ICICI, इ). मात्र यासाठी बँकच्या साइटवर जाऊन International Banking Enable करावं लागेल!
हे कार्डस आपण ebay.com/amazon.com सारख्या साइटवर(ebay.in/amazon.inनव्हे) विदेशातून वस्तु मागवण्यासाठीसुद्धा वापरू शकतो.
POS म्हणजे काय ? पॉइंट ऑफ सेल : या पद्धतींमध्ये आपण आपले प्लॅस्टिक मनी कार्ड विक्रेत्याच्या काऊंटरवर असलेल्या POS मशीनमध्ये स्वाईप करून पैसे देतो. POS मध्ये विक्रेता किंवा पैसे स्वीकारणार्‍या व्यक्तीकडे POS मशीन असावे लागते जे त्याच्या खात्याला जोडलेले असेल. त्यानंतर त्याचा ग्राहक कार्ड स्वाईप करून पिन टाकतो व त्यानंतर ग्राहकाच्या खात्यामधून रक्कम थेट विक्रेत्याच्या खात्यामध्ये जमा होते. ग्राहकाला लगेच पावती/Receipt मिळते व SMS सुद्धा येतो! ही पीओएस मशीन्स आता पेट्रोल पंम्प, दुकाने, थिएटर अशा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असतातच.

कार्डसच्या सुरक्षिततेसाठी काही सूचना :
१. तुमच्या कार्डचा पिन कधीही कोठेही अजिबात लिहून ठेऊ नका.
२. कार्डचा पिन कधीही कोणालाही अजिबात सांगू नका.
३. कार्डच्या मागे दिलेल्या जागेमध्ये सही करून ठेवा. (एसबीआय)
४. व्यवहार करून झाल्यावर कार्ड काढून घ्यायला विसरू नका:
५. हॉटेल, दुकाने यासारख्या ठिकाणी कार्ड दुसर्‍या व्यक्तीच्या ताब्यात देऊ नका. स्वतःच्या समक्ष व्यवहार करा.
६. कार्डचा फोटो/स्कॅन कोणाला पाठवू नका किंवा काढू देऊ नका.
७. कार्ड ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरताना तुमचे कार्ड डिटेल्स कधीही त्या साइटवर साठवू नका.
८. नेटकॅफे सारख्या सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरू नका.
९. तुमच्या कार्डवरील CVV, आलेला OTP, यूजरनेम/पासवर्ड कोणालाही सांगू नका.  
७. तुमच्या कार्डचे बँक खाते मोबाइल क्रमांकाला जोडून घ्या जेणेकरून कोणताही व्यवहार झाला की तुम्हाला बँकचा SMS मेसेज येईल!
८. कार्ड हरवल्यास ताबडतोब बँकमध्ये कळवा आणि ते ब्लॉक करून टाका. यासाठी बँकांनी स्वतःचे काही खास क्रमांक जाहीर केले आहेत. ते तपासून फोनमध्ये साठवून ठेवा.
उदा.  तुमचे कार्ड ब्लॉक करण्यासाठी खालील SMS पाठवा.
BLOCK XXXX हा एसएमएस 5676791 या क्रमांकावर तुमच्या बँक खात्याला जोडलेल्या फोन क्रमांकावरूनच पाठवा. इथे XXXX = तुमच्या हरवलेल्या कार्डवरील शेवटचे चार अंक

जर कार्ड ब्लॉक झाले असेल तर तुम्हाला आणखी एक एसएमएस येईल. जर नाही आला तर खालील फोन क्रमांकावर फोन करा.
39 02 02 02 (याच्या आधी लोकल एसटीडी कोड जोडा मग डायल करा) किंवा
1860 180 1290 किंवा 1800 180 1290 (from BSNL/MTNL lines)

इतर महत्वाचे लेख :
प्लॅस्टिक मनी म्हणजे काय प्लॅस्टिक मनी म्हणजे काय Reviewed by Sooraj Bagal on December 04, 2016 Rating: 5

2 comments:

Powered by Blogger.