![]() |
| Mukesh Ambani Announces Jio Prime Offer |
जिओच्या सध्याच्या ग्राहकांना व जे ग्राहक ३१ मार्च २०१७ पर्यंत नव्याने जिओ सुरू करतील (नवे ग्राहक). त्यांच्यासाठी ही जिओ प्राइम योजना सादर करण्यात आली आहे. म्हणजेच ३१ मार्च २०१७ पर्यंत जे काही ग्राहक जिओसोबत जोडले गेले असतील त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
ज्यांना सध्याची अनलिमिटेड ऑफर (हॅप्पी न्यू इयर ज्यामध्ये डाटा व कॉल फ्री आहेत) ही सुरू ठेवायची आहे त्यांना यासाठी रु. ९९ मोजावे लागतील, त्यानंतर त्यांना सध्याचीच ऑफर चालू प्लॅननुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत वापरता येईल! यासाठी नोंदणी MyJio App/जिओ स्टोअरमधून १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान करता येईल.
या नोंदणीचे रु. ९९ व दरमहा रु ३०३ देऊन तुम्ही अनलिमिटेड इंटरनेट, वॉइस कॉल व जिओ अॅप्सची (जिओ म्यूजिक, Mags, Xpress, जिओटीव्ही) एक वर्ष पूर्णतः मोफत वापरू शकतील! दरमहा रु ३०३ देऊन दरमहा 30GB डाटा हायस्पीड मिळेल व उरलेला डाटा कमी स्पीडमध्ये अमर्याद वापरता येईल.
म्हणजेच जिओ प्राइम या योजनेनुसार, तुम्हाला नोंदणीसाठी रु ९९ आणि अधिक प्रत्येक महिन्याला रु ३०३ देऊन इंटरनेट मोफत वापरता येईल. सध्या सुरू असलेल्या दर दिवशी 1GB 4G हायस्पीड डाटाचीच योजना वर्षभर सुरू ठेवण्यासाठी इतके पैसे मोजावे लागतील. दुसर्या शब्दात सांगायचं तर सध्याचीच ऑफर सुरू ठेवायला वर्षभर दरदिवशी रु १० मोजावे लागतील!
जिओ प्राइम ऑफर :
• नोंदणीसाठी रु ९९, नोंदणीसाठी मुदत १ मार्च ते ३१ मार्च
• दरमहा रु ३०३ यामध्ये 30GB हायस्पीड डाटा, कॉल, जिओ अॅप्स मोफत
• दररोज 1GB हायस्पीड डाटा त्यानंतर कमी वेगात अमर्यादीत डाटा
• जिओ प्राइम नोंदणीनंतर ३१ मार्च २०१८ पर्यंत उपलब्ध!
• प्राइमसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंत जे जिओच्या नेटवर्कवर आहेत त्यांनाच नोंदणी करता येईल.
जे ह्या "जिओ प्राइम" योजनेत सहभागी होणार नाहीत त्यांना वॉइस कॉल मोफतच असतील मात्र इंटरनेटसाठी ते ग्राहक जो प्लॅन स्वीकारतील त्या प्लॅननुसार पैसे द्यावे लागतील.
प्लॅन्स साठी लिंक : www.jio.com/en-in/4g-plans
अंबानी यांनी जाहिर केलेल्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे :
• २०१७ च्या शेवटपर्यंत संपूर्ण भारतभर (सर्व खेडी, शहरं) जिओची सेवा उपलब्ध असेल!
• जिओ ग्राहकांनी १०० करोड जीबी डाटा दर महिन्याला इतका वापर केला आहे!
• ज्यामुळे भारत मोबाइल डाटा वापरमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोचला आहे!
• या योजना संपल्यावरसुद्धा जिओ सध्या इतर ऑपरेटर देत असलेल्या प्लॅनच्या किंमतीत २०% अधिक इंटरनेट डाटा देईल असही त्यांनी जाहीर केलं!
incoming search terms : reliance jio prime mukesh ambani internet data offer
रिलायन्स जिओ प्राइम जाहीर, ३१ मार्चनंतरच्या जिओबद्दल
Reviewed by Sooraj Bagal
on
February 21, 2017
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
February 21, 2017
Rating:


Very informative, keep posting such good articles, it really helps to know about things.
ReplyDelete