2GUD : फ्लिपकार्टची आता वापरलेल्या वस्तूंसाठी नवी वेबसाइट!

फ्लिपकार्टने काही दिवसांपूर्वीच ईबे इंडियाचं अधिग्रहण पूर्ण करून त्यांची वेबसाइट बंद करत लवकरच एक नवा प्लॅटफॉर्म आणत असल्याच जाहीर केलं होतं. तर त्यानुसार काल 2GUD.com ही नवी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. यावर आता रिफर्बिश्ड वस्तू जसे की स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, इ. मिळतील.
लवकरच इतर प्रकारच्या वस्तूसुद्धा उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं आहे. सध्या 2GUD ची वेबसाइट केवळ फोनवर किंवा अॅपद्वारेच वापरता येईल.   
Refurbished products म्हणजे काय ? : एखाद्या ग्राहकाने वापरलेल्या किंवा बॉक्समधून उघडलेल्या वस्तु काही दोष असल्यास परत/ Return केल्या जातात. त्यामधील दोष कंपनीमार्फत दूर करून चाचण्या करून वॉरंटीसह विकल्या जाणार्‍या वस्तूंना रिफर्बिश्ड प्रोडक्टस म्हटलं जातं!
वॉलमार्टच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्लिपकार्टने 2GUD (टूगुड) वेबसाइटवरील रिफर्बिश्ड वस्तू अनेक चाचण्या करून वॉरंटी सर्टीफाय केलेल्या आहेत आणि विश्वासू आहेत असं सांगितलं! त्यांच्यातर्फे विकल्या
जाणार्‍या वस्तूंवर ३ ते १२ महीने वॉरंटी मिळेल.

१४ ऑगस्ट रोजी बंद झालेल्या eBay India चा अनुभव वापरुन जुन्या वस्तू विकण्यात येतील असं सीईओ कृष्णमूर्ती यांनी सांगितलं. फ्लिपकार्टचा सर्विस अनुभव यासाठी वापरला जाईल जो ग्राहकांना फायदेशीर ठरेल आणि उत्तम गुणवत्तेच्या वस्तू योग्य दरात मिळतील असही फ्लिपकार्टकडून सांगण्यात आलं आहे.
रिफर्बिश्ड वस्तू कशा प्रोसेस केल्या जातील याबद्दल व्हिडिओ : https://youtu.be/gHoUdmfk32I
 2GUD (टूगुड) वेबसाइटवर पाच प्रकारे वर्गवारी (2GUD Grades) करण्यात आली असून वस्तूच्या सद्यस्थितीनुसार Unboxed Like New, Superb, Too Good, Good, Okay अशा प्रकारे ग्राहकांना पर्याय उपलब्ध असणार आहेत!  
भारतात सध्या GreenDust, Amazon सारख्या वेबसाइटवर सुद्धा वापरलेल्या वस्तू विकत घेता येतात.


search terms 2GUD refurbished products smartphones laptop tablets by flipkart 
2GUD : फ्लिपकार्टची आता वापरलेल्या वस्तूंसाठी नवी वेबसाइट! 2GUD : फ्लिपकार्टची आता वापरलेल्या वस्तूंसाठी नवी वेबसाइट! Reviewed by Sooraj Bagal on August 23, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.