अॅपल काही क्षणांपूर्वीच जगातली पहिली ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल असलेली कंपनी बनली आहे. रुपयांमध्ये सांगायचं तर तब्बल ~ ६८ लाख कोटी रुपये भागभांडवल! अॅपलसोबत अल्फाबेट(गूगल), अमॅझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती! मात्र शेवटी अॅपलने बाजी मारत हा मान पटकावला आहे!
आयमॅक, आयपॅड, मॅकबुक, आयपॉड, आयफोन, अॅपल वॉच अशी उपकरणे आणि त्यांच्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर बनवणाऱ्या अॅपल कंपनीची स्थापना स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव्ह वॉझ्निअॅक यांनी १९७६ मध्ये केली होती. आजच अॅपलच्या शेअर्सनी $207.05 चा टप्पा ओलांडून ही किमया साधली आहे. काल उत्तम आर्थिक निकाल जाहीर झाल्यावर लगेच हा टप्पा ओलांडला गेला! २०११ नंतर सीईओ स्टीव्ह जॉब्जची जागा घेतलेल्या टीम कुक यांच्या नेतृत्वात अॅपलने तब्बल २०००% वाढ नोंदवली गेली आहे!
![]()  | 
| Steve Jobs and Steve Wozniak | 

search terms : Apple first company to cross $1 trillion market cap US nasdaq
अॅपल बनली आहे 1 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल असलेली जगातली पहिली कंपनी!
 
        Reviewed by Sooraj Bagal
        on 
        
August 03, 2018
 
        Rating: 
      
 
        Reviewed by Sooraj Bagal
        on 
        
August 03, 2018
 
        Rating: 



No comments: