फेसबुक, इंस्टाग्राम ही अॅप्स आता दैनंदिन वापराचा भाग झाली आहेत. व्हॉट्सअॅप इतका नसला तरी अनेकांचा बऱ्यापैकी वेळ या दोन अॅप्सवर सुद्धा जातोच. एकत्रित वेळ विचारली तर बरेच जण एका तासाच्या आसपास असेच उत्तर देतील मात्र प्रत्यक्षात वारंवार फोन तपासलेला वेळ गृहीत धरला तर ही वेळ नक्कीच तासापेक्षा अधिक असेल! कोणी लाईक केलं का? काय कमेंट केली? नवा फॉलोअर कोण आहे? कुणाची रिक्वेस्ट आली आहे? असा प्रश्न ह्या नोटिफिकेशन्स पाहून पडतो आणि मग फोन उघडून आपल्याकडून ते अॅप पाहिलं जातंच!
आता यावर फेसबुक आणि इंस्टाग्राम (ज्याची मालकी फेसबुककडेच आहे.) यांनी नवी टूल्स उपलब्ध करून दिली असून ज्याद्वारे आपण आपल्या वेळेवर लक्ष ठेऊ शकतो! अलर्टस लावून आपला वेळ वाचवू शकतो! नोटिफिकेशनवर नियंत्रण, डॅशबोर्ड जो अॅप वापरल्याची वेळ दर्शवेल अशा सुविधा देण्यात आल्या आहेत!
• Your Activity: इंस्टाग्रामवर घालवलेला वेळ पाहण्यासाठी त्या त्या दिवशीच्या बार वर टॅपकरून पहा.
• Daily Reminder: याद्वारे रोज एक आठवण करून देण्यासाठी अलर्ट जोडता येईल!
• Mute Push Notifications: 'Notification Settings' मध्ये जाऊन 'Mute Push Notifications' सुरु केल्यास नोटिफिकेशन्स बंद करण्यात येतील.
search terms facebook instagram time management your activity how to use

ज्यावेळी वापरकर्ते फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरतील तेव्हा त्यांचा वेळ चांगल्या कामासाठी खर्च झाला असं वाटलं पाहिजे : अमित रणदीवे (इंस्टाग्रामचे प्रॉडक्ट डायरेक्टर)या संबंधित रोलआऊट सुरु झालं असून हळूहळू ह्या सुविधा सर्वाना उपलब्ध करून देण्यात येतील. प्रोफाइल मध्ये जाऊन Your Activity मध्ये हे बदल पाहता येतील. प्ले स्टोरवर हे अपडेट उपलब्ध झालेलं आहे.
search terms facebook instagram time management your activity how to use
फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध!
Reviewed by Sooraj Bagal
on
August 02, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
August 02, 2018
Rating:

No comments: