Pubg Mobile ने ओलांडला १० कोटी डाऊनलोड्सचा टप्पा!


काही दिवसांपूर्वीच मोबाईल साठी उपलब्ध झालेल्या PUBG (प्लेयर अननोन बॅटलग्राउंड्स) ने १० कोटी डाउनलोडसचा टप्पा पार केला आहे. यामध्ये चीन, जपान, कोरियामधील डाउनलोडसचा समावेश नसल्यामुळे आकडा आणखीनच मोठा असणार आहे. त्याचबरोबर या गेमने दररोज १.४ कोटी वापरकर्त्यांच्या टप्पासुद्धा पार केला आहे.

पीसीसाठी उपलब्ध असलेली ही गेम मार्चमध्ये स्मार्टफोन्सवर मोफत उपलब्ध झाली या गेमला गेमर मंडळींचा सध्या सर्वत्र मोठा प्रतिसाद लाभत आहे. मागील महिन्यातच PUBG Mobile 0.7.0 अपडेट उपलब्ध झाला होता ज्यामध्ये अधिक काळासाठी ऑब्जेक्टिव्हज पूर्ण करून नवे कपडे मिळवणे, क्लॅन जॉईन करणे, कस्टम रूम्स मध्ये FPP, आर्केड मोडमध्ये अधिक वेगवान मोड, नवी शस्त्रे, सामना सुरु असताना सुद्धा कुठेही इमोट्स वापरता येणे यांसारख्या सोयी देण्यात आल्या होत्या.

या गेम साठी एम्युलेटर सुद्धा उपलब्ध असून याद्वारे पीसीवर मोबाइल व्हर्जन मोफत खेळता येतं…!
Pubg Mobile ने ओलांडला १० कोटी डाऊनलोड्सचा टप्पा! Pubg Mobile ने ओलांडला १० कोटी डाऊनलोड्सचा टप्पा! Reviewed by Swapnil Bhoite on August 19, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.