एअरटेलच्या ग्राहकांना आता गूगल असिस्टंटद्वारे अकाउंट बॅलन्स, डेटा बॅलन्स, ऑफर्स पाहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशाप्रकारची सुविधा गूगल असिस्टंटद्वारे देणारी एअरटेल पहिलीच कंपनी आहे. यामुळे ग्राहकांना विविध USSD कोड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नसून अगदी मनोरंजकपणे अकाऊंटबद्दल माहिती मिळवता येणार आहे.
कसे वापराल ?
- गूगल असिस्टंट उघडा (Home बटन दाबून धरा / Ok Google म्हणा /येथे डाऊनलोड करा व उघडा
- यानंतर आपणास “टॉक टू एअरटेल“(Talk to Airtel), “आस्क एअरटेल”(Ask Airtel) किंवा or “गेट एअरटेल” (Get Airtel) असे गूगल असिस्टंटला सांगावे लागेल.
- एअरटेल असिस्टंट यामध्येच चालू होईल. जर आपण प्रथमच ही सुविधा वापरत असाल तर फोन नंबर विचारला जाईल व OTP द्वारे आपणास अकाउंट लिंक करावे लागेल.
आता तुम्ही खालील प्रश्न विचारून गूगल असिस्टंटद्वारे सहजरित्या अकाउंटबद्दल माहिती मिळवू शकता.
सध्या ही सुविधा फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध असून लवकरच मराठीसह प्रादेशिक भाषांत उपलब्ध होईल असे एअरटेलतर्फे सांगण्यात आले आहे. गूगल असिस्टंट आता मराठीत उपलब्ध झाला असल्याने (लेख पहा) लवकरच मराठीमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल अशी आशा आहे.
- गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ? याबद्दल व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आता गूगल असिस्टंटमध्ये एअरटेलच्या अकाऊंटची माहिती! : बॅलन्स विचारा, ऑफर्स पहा!
Reviewed by Swapnil Bhoite
on
October 23, 2018
Rating:
Reviewed by Swapnil Bhoite
on
October 23, 2018
Rating:



No comments: