उपयोगी अॅप्स मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये आपण आणखी काही चांगले अॅप्स पाहणार आहोत. या मालिकेद्वारे आमचा प्रयत्न आहे की काही चांगले अॅप्स ज्यामध्ये काही नावाजलेले असतील तर काही भन्नाट अॅप्सची वाचकांना ओळख व्हावी. आम्ही दिलेल्या अॅप्सना तुमच्या विशिष्ट गरजेनुसार आणखी चांगले पर्याय सुद्धा उपलब्ध असू शकतात त्याचा सुद्धा आपण शोध घेऊ शकता. आपल्या प्रतिक्रियांसोबतच जर आपणास कोणते अॅप या लेखामध्ये सुचवायचे असेल तर आम्हाला अवश्य कळवा.
Settle Up - Group Expenses : अनेकदा ग्रुपमध्ये फिरायला जाताना असो की होस्टेलवर एकत्र राहताना, आपणास कोणी केव्हा आणि किती पैसे दिले वगैरेचे हिशोब ठेवावेच लागतात. यासाठीच Settle Up हे अॅप नक्कीच उपयोगी पडते. यामध्ये एकट्याने नोंदी ठेवता येतात किंवा सर्वांनी मिळून सुद्धा. जमा केलेल्या रकमेसोबतच तिथे कशासाठी खर्च केला आहे याची माहिती सुद्धा लिहिता येते. यामध्ये एक चांगली सुविधा असून जेव्हा शेवटचा हिशोब करण्याची वेळ येते त्यावेळेस आपणास डायरेक्ट कोणत्या मेंबरने किती रक्कम कोणाला द्यायची आहे याबद्दल समजते. या अॅपचे वेब व्हर्जन सुद्धा उपलब्ध असून सर्व डेटा ई-मेल करण्याची सुविधा तसेच CSV एक्स्पोर्ट (मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पाहता येईल) ची सुविधा उपलब्ध आहे.
डाउनलोड लिंक - Settle Up - Group Expenses
Your Phone Companion : मोबाईलमध्ये फोटो काढल्यानंतर मोबाइलमधून डेस्कटॉपवर पाठवताना डेटा केबल जोडण्याच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी हे अॅप नक्कीच उपयोगी पडते. सोबतच मोबाइलवर आलेले मेसेज सुद्धा यामधून वाचता येतात. मायक्रोसॉफ्ट तर्फे हे उपलब्ध करून देण्यात आले असून येत्या काळात यामध्ये अनेक नवीन सुविधांची भर पडण्याची शक्यता आहे. सध्या लेटेस्ट २५ फोटोच यामधून इंटरनेटद्वारे शेअर करता येतात. यासाठी आपल्या डेस्कटॉपवर Your Phone अॅप असणे आवश्यक आहे. जर आपणाकडे विंडोज १० लेटेस्ट व्हर्जन असेल तर यामध्ये आधीपासूनच हे अॅप उपलब्ध आहे.
डाउनलोड लिंक - मोबाईल / डेस्कटॉप
LastPass Password Manager : आपले खूप सारे अकाउंट व त्यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे खूपच अवघड होऊन जाते अशामुळे एकसारखे पासवर्ड वापरले जातात व यामुळे एखादा पासवर्ड किंवा त्याबद्दलची कोणतीही माहिती वाईट व्यक्तींच्या हाती लागल्यास आपल्या ऑनलाईन सुरक्षिततेमध्ये धोके उद्भवू शकतात. यासाठीच लास्टपास हे अॅप उपयोगी पडते. तुम्ही फक्त 'पासवर्ड मॅनेजर' चा मास्टर पासवर्ड हा एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा आणि बाकी सर्व पासवर्ड पासवर्ड मॅनेजर लक्षात ठेवेल. इथे तुम्ही फक्त पासवर्डच नाही तर आणखी ही माहिती साठवू शकता जसे नोट्स, डॉक्युमेंट, फॉर्म फिल्स आणि बरेच काही...ही Encrypted (सांकेतिक भाषेत) साठवलेली असल्याकारणाने (Lastpass स्वतः सुद्धा तुमचा Encrypted पासवर्ड/डाटा पाहू शकत नाही) जरी Lastpass चा डाटा लीक झाला तरी त्याचा उपयोग करता येत नाही.
याबद्दल आमचा लेख पहा - पासवर्ड मॅनेजर्स...
डाउनलोड लिंक - LastPass Password Manager
डाउनलोड लिंक - Firefox Rocket
उपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2
Reviewed by Swapnil Bhoite
on
October 28, 2018
Rating:
Reviewed by Swapnil Bhoite
on
October 28, 2018
Rating:





No comments: