व्हॉट्सअॅपच्या संदेश पाठवल्यावर डिलिट करण्याच्या सुविधेत नवा बदल!


मागील वर्षी व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना पाठविलेला संदेश डिलीट करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती त्याअंतर्गत सुरवातीस ७ मिनिटांपर्यंत संदेश मागे घेता येत होता त्यानंतर त्यामध्ये बदल करून याची मर्यादा १ तास ८ मिनिट १६ सेकंदापर्यंत करण्यात आली होती. यामध्ये व्हॉट्सअॅपतर्फे आता विशिष्ट वेळेपर्यंतचे लिमिट लावण्यात येणार आहे जेणेकरून व्हॉट्सअॅप अॅपमध्ये बदल करून कोणत्याही वापरकर्त्याला १३ तासांआधीचे संदेश डिलीट करता येणार नाहीत.

आपण संदेश पाठविला व १ तास ८ मिनिट १६ सेकंदापर्यंत Delete For Everyone पर्याय निवडला तर तो संदेश दोन्ही फोनवरून काढून टाकला जातो परंतु नव्या नियमांनुसार जर डिलिट रिक्वेस्ट १३ तास ८ मिनिट १६ सेकंदापर्यंत पोचली नाही तर तो संदेश दोन्ही ठिकाणहून डिलीट केला जाणार नाही. याचाच अर्थ आपण Delete For Everyone पर्याय निवडला परंतु या कालावधीपासून संदेश प्राप्तकर्ता जर १३ तास ८ मिनिट १६ सेकंदापर्यंत ऑफलाईन असेल तर तो संदेश डिलीट केला जाणार नाही.

काही महिने व वर्षापूर्वीचे संदेश वापरकर्त्यांना डिलीट करता येऊ नयेत त्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे WABetaInfo तर्फे सांगण्यात आले आहे. ही सोय वापरण्यासाठी आपणास कोणतेही बदल करण्याची गरज नसून अपडेटद्वारे आपोआपच तो वापरकर्त्यांना उपलब्ध होईल.

https://twitter.com/WABetaInfo/status/1050496770877415424


व्हॉट्सअॅपच्या संदेश पाठवल्यावर डिलिट करण्याच्या सुविधेत नवा बदल! व्हॉट्सअॅपच्या संदेश पाठवल्यावर डिलिट करण्याच्या सुविधेत नवा बदल! Reviewed by Swapnil Bhoite on October 15, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.