अॅमेझॉनने ऑडिबल (Audible) ही ऑडिओबुक्सची सबस्क्रिप्शन सेवा इतर सेवांनंतर बराच कालावधी घेत एकदाची भारतात सादर केली आहे. ही सेवा १९९ दरमहा या दराने उपलब्ध आहे. प्रथमच वापर करणाऱ्या सर्व यूजर्ससाठी ऑडिबल ३० दिवस चाचणीसाठी मोफत असेल.
सध्या ऑडिबलमध्ये आपण तब्बल २,००,००० हून अधिक ऑडिओबुक्स ऐकू शकाल. अँड्रॉइड व iOS यूजर्सना
अॅपद्वारे लवकरच उपलब्ध होतील. सध्या याची चाचणी सुरू असल्याच अॅमेझॉन इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय ऑडिओबुक्स अधिक मोठ्या संख्येने जोडली जात आहेत आणि यात दररोज भर घातली जाईल.
ऑडिओबुक म्हणजे असं पुस्तक जे डिजिटली उपलब्ध असून फक्त ऐकण्यासाठीच बनवलेलं असतं. हे पुस्तक आपण ऐकत दुसरी कामे करू शकतो किंवा डोळ्यांना ताण न देता निवांत ऐकत राहू शकतो. आवाज देण्याच्या दृष्टीने खास काळजी घेतलेली असते.ऑडिबलचे प्लॅन्स दरमहा ₹१९९ त्यासोबत ६ महिन्यासाठी ₹ १३४५ तर एक वर्षासाठी ₹ २३३२ असे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑडिओबुक्स आपण फोन, टॅब्लेट, पीसी कुठेही ऐकू शकता. या प्रत्येक डिव्हाईससाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
Amazon Audible India Wesbite : www.audible.in
अॅमेझॉनच्या अलीकडे सादर झालेल्या सेवांबद्दल लेख :
अॅमेझॉनची ऑडिओबुक्स सेवा 'ऑडिबल' (Audible) आता भारतात!
Reviewed by Sooraj Bagal
on
November 10, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
November 10, 2018
Rating:



No comments: