फेसबुक पन्नास लाख भारतीयांना शिकवणार डिजिटल स्किल्स!


भारतातील लघुउद्योगांना जगातील अर्थव्यवस्थेचा भाग बनत यावं या उद्देशाने फेसबुक पन्नास लाख भारतीय नागरिकांना डिजिटल स्किल्स/कौशल्यं शिकवणार असल्याचं शनिवारी सांगण्यात आलं आहे.

आधीच सुरु असलेल्या कार्यक्रमाद्वारे फेसबुकने १५० शहरे आणि ४८००० गावांतील दहा लाख लोकांना शिकवलं असल्याचं म्हटलं आहे. या शिकवण्याच्या कार्यक्रमात सोप्या भाषेत समजतील असे धडे समाविष्ट केलेले असून आपलं डिजिटल अस्तित्व कसं उभारायचं किंवा सुरु करायचं?, वेबसाइट्सवर खर्च करण्याऐवजी कसा व्यवसाय करता येऊ शकतो, मोबाइलच्या वाढत्या वापराचा कसा फायदा घेता येईल आणि फेसबुकच्या प्रचंड मोठ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवसाय कसा वाढवला जाऊ शकतो याबद्दल माहिती देण्यात येते.

याच कार्यक्रमामध्ये इंस्टाग्रामच्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा सांगितलं जाईल. हे ट्रेनिंग मोड्युल फेसबुकने स्वतः विकसित केलं असून १४ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे जे डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईन सुरक्षितता शिकवेल. हा कार्यक्रम २९ राज्यात पोहोचला असून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिसा, राजस्थान यांच्यापासून सुरुवात झाली आहे.
यासोबतच फेसबुक जॉब्स द्वारे स्थानिक जागांसाठी नियुक्तीबद्दल जाहिराती पोस्ट करता येतील त्यामुळे अगदी खेड्यांमध्येही नोकरी शोधणं सोपं होईल असं फेसबुकतर्फे सांगण्यात आलं आहे.

अलीकडेच खोटी/चुकीची माहिती पसरवणाऱ्या कोट्यवधी खात्यांना फेसबुकवरून काढून टाकल्याचं मार्क झकरबर्ग यांनी सांगितलं होतं.    
फेसबुक पन्नास लाख भारतीयांना शिकवणार डिजिटल स्किल्स! फेसबुक पन्नास लाख भारतीयांना शिकवणार डिजिटल स्किल्स! Reviewed by Sooraj Bagal on November 25, 2018 Rating: 5

2 comments:

  1. जेणे करुन ही लोकं फेसबुक अडव्हर्त पद्धतशीर रित्या वापरू शकतील. फेसबुक वर बिझनेस कशा प्रकारे पैड प्रमोशन करायचे हा अजेंडा असणार

    ReplyDelete
    Replies
    1. होय मुख्य उद्देश तर तोच असणार आहे. फेसबुकद्वारे उत्पादने विकायला शिकवण्याचा...

      Delete

Powered by Blogger.