फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!


UPI पेमेंट्स सुरू करणार्‍या पहिल्या अॅप्सपैकी एक असलेलं फ्लिपकार्टचं फोनपे (PhonePe) अॅप आता घेऊन आलं आहे आयआरसीटीसीच्या रेल्वे बुकिंगची सुविधा! फोन/डिश रिचार्ज,  वीज/गॅस बिल भरणा, बस/हॉटेल/कॅब/विमान असं सर्व प्रकारची पेमेंट्स करण्याची सोय असलेल्या या अॅपमध्ये फक्त रेल्वे बुकिंगचीच सोय राहिली होती आणि आता ती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे! शिवाय यावर कोणतही अतिरिक्त शुल्क लागणार नाही!
फोनपेने आजच तब्बल १०० कोटी व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे! 

फोनपे द्वारे रेल्वे तिकीट कसं बुक करायचं? :

  1. होम मधून Apps मध्ये जा 
  2. Apps मध्ये IRCTC पर्याय निवडा
  3. आता प्रवासाची माहिती भरा व Search Trains पर्याय निवडा
  4. योग्य ती ट्रेन निवडून पुढे जा आणि आता IRCTC चा UserID टाका 
  5. Continue करून डिटेल्स भरा आणि पुढे जा 
  6. आता पेमेंट साठी भीम UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी पर्याय निवडून Pay करा 
  7. तुमचं रेल्वे तिकीट बुक झालेलं दिसेल!     
फोन पे डाउनलोड करण्यासाठी लिंक्स :
अँड्रॉइड : PhonePe on Google Play
iOS : PhonePe on AppStore 
फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय! फोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय!  Reviewed by Sooraj Bagal on November 16, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.