विविध पदार्थ घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या स्विगी (Swiggy) या प्रसिद्ध फुड डिलिव्हरी कंपनीने दहा शहरात २००० महिला ड्रायव्हर्सची नियुक्ती करत असल्याचं जाहीर केलं आहे. मार्च २०१९ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. फुड डिलिव्हरी क्षेत्रात महिलांची कमी असलेली संख्या पाहून हे पाऊल उचलत असल्याचं स्विगीतर्फे सांगण्यात आलं आहे.
या महिलांसाठी सेफ झोन निवडलेले असतील जेथे त्यांना सुरक्षितपणे काम करता येईल आणि त्यांच्या ऑर्डर्स संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचं बंधन असेल. यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या एक लाखाहून अधिक संख्या असलेला कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे आहे यामध्ये कोची, अहमदाबाद, मुंबई, पुणे या शहरात सध्या केवळ ६० महिला आहेत.
सोबतच पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या ड्रायव्हर्ससाठी Swiggy Smiles जाहीर केलं असून याद्वारे त्यांना कॉलवर डॉक्टर्स, शैक्षणिक शिष्यवृत्ती (मुलानासुद्धा), कर्ज, इ. देण्यात येईल!
२०१४ मध्ये सुरुवात झालेलं स्विगी अॅप प्रचंड लोकप्रिय झालं असून ५०,००,००० हून अधिक इन्स्टॉलेशन्स झाले आहेत. ग्राहकांमध्येसुद्धा इतर सेवांशी तुलना करता स्विगी उत्तम सेवा देतं अशी भावना असल्याचं पाहायला मिळतं. त्यांची सध्या ४५ शहरात ४५००० हून अधिक हॉटेल्ससोबत भागीदारी आहे! महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरात यांची सेवा उपलब्ध आहे. स्विगीची या क्षेत्रात उबर इट्स, फुडपांडा, झोमॅटो यांच्याशी स्पर्धा पाहायला मिळते.
माहिती साभार : Medianama
search terms : swiggy to employ 2000 women drivers for food delivery swiggy in marathi
स्विगी करणार २००० महिला ड्रायव्हर्सची नियुक्ती!
Reviewed by Sooraj Bagal
on
November 21, 2018
Rating:
No comments: