CM फाइल मॅनेजर, किका किबोर्डची प्ले स्टोअरवरुन हकालपट्टी : जाहिरातींद्वारे गैरव्यवहार!


अनेकांच्या फोन्समध्ये इंस्टॉल्ड असलेले क्लिन मास्टर, CM फाईल मॅनेजर, किका किबोर्ड CM लाँचर, CM लॉकर असे अॅप्स डेव्हलप करणार्‍या चिता मोबाइल व किका टेक यांच्यावर गूगल प्ले स्टोअरने जाहिरातींचा गैरव्यवहार करून क्लिक्समध्ये वाढ करून वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कृती केल्याने कारवाई केली आहे.
या डेव्हलर्सचे अॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून काढून टाकून त्यांचे Admob अॅड नेटवर्क थांबवण्यात आलं आहे!

अंतर्गत अभ्यासानंतर गूगलला या अॅप्सद्वारे नकळत अॅप्स इंस्टॉल केले जात असल्याच लक्षात आलं आहे. त्यावर कारवाई म्हणून ही अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली आहेत.

अॅड क्लिक फ्रॉड हा प्रकार अँड्रॉइडमध्ये अनेक वर्षांपासून सुरु आहे. गूगल काही कारणाने यावर कारवाई करतच नाही. यांना जर सुरवातीलाच प्रतिबंध केला तर असे अॅप्स पसरण थांबवता येऊ शकत. असे अॅप्स इंस्टॉल केले की आपल्या फोन्स जाहिरातींनी आणि आपण न इंस्टॉल केलेल्या अॅप्सने भरून गेलेला दिसतो. क्लिन मास्टरसारख्या अॅप्स द्वारे आपला फोन काही क्षण वेगवान झाल्यासारखा वाटत असला तरी त्याची मोठी किंमत चुकवावी लागत असते हे बर्‍याच जणांना लक्षात येत नाही.
गूगल प्ले स्टोअर सुरक्षेच्या बाबतीत अॅपलच्या अॅप स्टोअरच्या बरच मागे आहे असं म्हणावं लागेल. अॅपल अॅप स्टोअरवरील येणार प्रत्येक अॅप स्वतः तपासून पाहतं! गूगल मात्र कोणीही टाकलेल कुठल्याही अॅपला प्ले स्टोअरवर थेट प्रवेश देतं जोवर ते अॅप नियमांच उल्लंघन करत आहे हे लक्षात येतं तोवर  ते अॅप लाखो लोकांच्या फोन्समध्ये वापरात असतं! 

खालील अॅप्सवर कारवाई करण्यात आल्याच गूगलकडून सांगण्यात आलं आहे: 

  • Clean Master
  • CM Launcher 3D
  • Security Master
  • Battery Doctor
  • Cheetah Keyboard
  • CM Locker

यातल्या CM File Manager व Kika Keyboard २५ कोटी डाउनलोडस पूर्ण झालेत आहेत. याचा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या डेव्हलपरनी वापरकर्त्याना फसवून खोट्या/फसव्या जाहिराती दाखवल्या आहेत! चिता मोबाइल (Cheetah Mobile CM) यांच्या तर एकत्रित डाउनलोडसची संख्या २०० कोटींवर आहे! यावरून अंदाज लावला जाऊ शकतो यांनी अशा खोट्या जाहिरातीतुन किती मोठा पैसा कमवला असेल आणि कित्येकांच्या फोन्सवर न सांगता अॅप्स इंस्टॉल केले असतील! सध्या हा लेख लिहताना CM चे काहीच अॅप्स हटवलेले दिसत आहेत तर क्लिनमास्टर अजूनही पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर नजर ठेऊन असल्याचं सांगितलं आहे.

मराठीटेकचा सल्ला असा आहे की असे क्लिन मास्टर, अॅप किलर , अमुक तमुक फाईल मॅनेजर/ब्राउजर अॅप्स वापरू नका. त्यांचा खर्‍या कामापेक्षा जाहिराती दाखवण्यासाठीच जास्त वापर केला जात आहे हे लक्षात घ्या.

search terms : google play store removes clean master and other cheetah mobile apps
CM फाइल मॅनेजर, किका किबोर्डची प्ले स्टोअरवरुन हकालपट्टी : जाहिरातींद्वारे गैरव्यवहार! CM फाइल मॅनेजर, किका किबोर्डची प्ले स्टोअरवरुन हकालपट्टी : जाहिरातींद्वारे गैरव्यवहार!      Reviewed by Sooraj Bagal on December 05, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.