नोकिया ८.१ सादर : PureDisplay व Snapdragon 710 सोबत!


नोकीयाने त्यांचा नवा स्मार्टफोन Nokia 8.1 दुबईमध्ये सादर केला असून यामध्ये सर्वात नवी अँड्रॉइड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टिम पाहायला मिळेल. यामधील प्युअरडिस्प्ले आणि नवा Snapdragon 710 या फोनचं वैशिष्ट्य ठरणार आहेत. हा फोन आज भारतात सादर झाला असून हा अॅमेझॉन आणि ऑफलाईन दुकानांमध्ये २० तारखेपासून उपलब्ध होतोय. आज १० डिसेंबरपासून प्रिऑर्डर सुरु होत आहे.   
नोकियाकडून स्मार्टफोन ब्रॅंडिंग घेतलेल्या HMD ग्लोबल कंपनीने सुरुवात झाल्यापासून दोन वर्षात ७ कोटी फोन्सची विक्री केली असल्याचं जाहीर केलंय!     
यासोबत आता HMD Global ची ही नोकिया स्मार्टफोन कंपनी आता पुन्हा एकदा आघाडीवर पोहोचली असून त्यांच्या फोन्सना मिळणारा अँड्रॉइड सपोर्ट व नोकिया नावावर असलेला विश्वास हे त्यांच्या यशाचं एक कारण मानलं जात आहे. 

Nokia 8.1 Specs :
डिस्प्ले : 6.18’’ Full HD+ PureDisplay 18.7:9 Corning Gorilla Glass, 2.5D Glass
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
रॅम : 4 GB LPPDDR4x
प्रोसेसर (CPU) : Qualcomm Snapdragon 710
स्टोरेज : 64 GB + MicroSD card slot Support for up to 400 GB
कॅमेरा : 12 MP 1/2.55’’, 1.4um pixels, OIS 2PD + 13 MP FF
फ्रंट कॅमेरा : 20 MP FF/0.9um
सेन्सर्स : Ambient light sensor, Proximity sensor, Accelerometer (G-sensor), E-compass, Gyroscope, Fingerprint sensor (rear), NFC
बॅटरी : 3500 mAh 18 W fast charging
इतर : WiFi 802.11 b/g/n/ac, Bluetooth® 5.0, GPS/AGPS+GLONASS+Beidou, 3.5 mm headphone jack,USB Type-C
रंग : Colors Blue/Silver, Steel/Copper, Iron/Steel
किंमत : ₹ २६९९९

नोकिया ८.१ सादर : PureDisplay व Snapdragon 710 सोबत! नोकिया ८.१ सादर : PureDisplay व Snapdragon 710 सोबत! Reviewed by Sooraj Bagal on December 07, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.