बर्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेला स्नो मॅप एकदाचा उपलब्ध झाला असून पब्जी पीसी आवृत्तीमध्ये हा पाहायला मिळेल. या मॅपला विकेंडी Vikendi असं नाव देण्यात आलं असून इरँगल, मिरामार, सॅनहॉक नंतर हा नवा मॅप १९ डिसेंबरपासून लाईव्ह सर्व्हरवर येईल. सध्या टेस्ट सर्व्हरवर हा मॅप वापरू शकतो! हा मॅप प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स या कॉन्सोल्सवर जानेवारीत पाहायला मिळेल!
टेस्ट सर्व्हरवर उपलब्ध असलेला हा मॅप चाचणीसाठी असून याद्वारे या मॅपमध्ये खेळताना येणाऱ्या अडचणी/बग्ज दूर करता यावेत या उद्देशाने टेस्ट सर्व्हरवर आधी उपलब्ध करून देण्यात आलेला असतो. हा मॅप 6 x 6 ग्रिड असलेला आहे आणि पूर्णतः बर्फाने आच्छादलेला आहे. हा मॅप आर्क्टिकमधील रिसॉर्ट आयलंड आधारित असल्याचं सांगितलं जातंय. दुकाने, गावं, डायनो पार्क, कॉस्मोड्रोम अशा गोष्टी पाहायला मिळतील. यामध्ये प्लेयर बर्फावरून चालल्यानंतर बर्फावर पावले उमटणार असल्यामुळे आणखी काळजी घेऊन गेम खेळावी लागेल! G36C ही नवी बंदूक जोडण्यात आली आहे.
हा विकेंडी मॅप लवकरच पब्जी मोबाईलमध्येही 0.10 अपडेटद्वारे उपलब्ध होणार आहे! सोबतच ही गेम प्लेस्टेशनवर येणार आहे. ही गेम सध्या विंडोज, अँड्रॉइड, एक्सबॉक्सवर उपलब्ध आहे.
पब्जी पीसीवर नवा विकेंडी मॅप : बर्फाळ भागात गेमची मजा!
Reviewed by Sooraj Bagal
on
December 09, 2018
Rating:
Reviewed by Sooraj Bagal
on
December 09, 2018
Rating:



No comments: