गूगल क्रोमची किमया



गूगल क्रोमची अॅपलच्या iOS साठीची मोफत आवृत्ती अॅप्लिकेशन स्टोरवरती पहिल्या क्रमांकाची जागा पटकावण्यात यशस्वी झाली आहे(मुख्य मोफत) . तब्बल ३१०० लाख  वापरकर्त्यांसह क्रोमने जवळपास १०० टक्के वाढ गेल्यावर्षी नोंदवली आहे. याधीच्या वर्षी हीच संख्या १६०० लाखांपर्यंत होती.


गूगल क्रोम हा  जगातील सर्वात वेगवान वेब ब्राऊजर आहे.(डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा----गूगल क्रोम )
Chrome for iOS Tops App Store
दरदिवशी  क्रोमच्या  वापरकर्त्यांकडून सुमारे १ TB (टेराबाइट) एवढा माहितीचा साठा डाऊनलोड केला जातो आणि ६०० लाख शब्द  लिहिले जातात (माऊंटेन व्यूच्या संघाच्या माहितीनुसार ). गूगलने असेही सांगितले आहे की त्यांच्या क्रोमच्या वेगवान प्रकट होण्याच्या तंत्रामुळे वापरकर्त्यांचा तब्बल १३ वर्षांचा कालावधी वाचवला आहे आणि आम्ही त्या तंत्राला धन्यवाद देऊ इच्छितो.

          क्रोमच्या synthesize म्हणजेच आपली माहिती (जसे की पासवर्ड,बूकमार्क,हिस्टरी)  आपल्या गूगल अकाऊंटवर साठवून   ती माहिती पुन्हा इतर कोणत्याही क्रोम असलेल्या साधनामध्ये वापरू शकतो.त्यामुळे आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवावा लागत नाही. तसेच आपले नाव ,ईमेल ,पत्ता ह्या गोष्टी पुढील प्रत्येक वेळी आपोआपच टाकल्या जातात.
          हा ब्राऊजर आपल्याला Private ब्राऊजिंग करण्याची सुविधा देतो ज्यामध्ये आपले पासवर्ड आणि हिस्टरी साठवली जात नाही ही सुविधा आपल्याला आपण जेव्हा नेट कॅफे सारख्या ठिकाणाहून सर्फिंग करताना उपयोगी पडते.ज्यासाठी सेटिंग्समध्ये New Incognito Window वरती क्लिक करावे लागते.


चार वर्षांपूर्वीच ब्राऊजर मार्केटमध्ये येऊन गुगल क्रोमनेचांगलीच बाजी मारली आहे यामध्ये त्यांनी घेतलेल्या भरा-या आणि आणलेल्या सुविधा वेब जगताला थक्क करणा या होत्या या ब्राऊजरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते मॅक लिनक्स अँड्रॉइड आणि आयओएस अशा विविध ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारे व्हर्जन्स बाजारात आणले आहेत क्रोम हे एकमेव असे ब्राऊजर आहे की जे आपल्याला लॅपटॉप डेस्कटॉप मोबाइल अशा सर्व ठिकाणी एकाच लॉगइनवरून उपलब्ध होऊ शकते यासाठी केवळ आपल्याला क्रोमचं लॉगइन करावं लागतं .एकदा का तुमचं लॉगइन झालं की तुम्ही कोणतंही डिवाइस हातात घ्या आणि ब्राऊजिंगचा आनंद लुटा क्रोमच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त त्याची काही खास वैशिष्ट्ये आणि एक्सटेन्शन ... 

इनकाँगनिटो मोड : इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये असलेली इनप्रायव्हेट ही सुविधा क्रोममध्ये इनकाँगनिटो मोड यानावाने उपलब्ध करून देण्यात आली आहे ही सुविधा नुकतीच मुख्य प्रवाहात आणली आहे यापूर्वी याचं ट्रायल व्हर्जनच उपलब्ध होतं 

वेब स्टोअर : क्रोमने अनेक सुविधा प्रथम बाजारात आणल्या यातील एक महत्त्वाची सुविधा म्हणजे वेब अॅप्स .यामध्ये अँग्री बर्डपासून ते अनेक गाजलेल्या अॅप्सचा समावेश आहे 

ट्रान्सलेटर : क्रोमने गुगलची ट्रान्सलेटर ही सुविधा इतर ब्राऊजर्सपेक्षा वेगळी सुरू केली आहे यातीलभाषांतराचा दर्जा इतर ब्राऊजर्सवरील ब्राऊजर्सपेक्षा खूपच चांगला आहे यासाठी गुगलने खास सुविधा लाँच केलीआहे 

गुगल क्रोम हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि लोकांना आवडणारे हे ब्राऊजर असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातसमोर आले आहे या ब्राऊजरचा सर्वाधिक वापर हा एचटीएमएल वापणाऱ्यांनी केला आहे यामुळे यातील सर्वसुविधा अॅडव्हान्स बनविण्यात येत आहेत क्रोमच्या विविध सुविधांमुळे टेकसॅव्हींच लाइफ खूप चांगलं झालं आहे .याची काही उदाहरणं देता येतील ती क्रोच्या विविध एक्स्टेन्शन्सची 

स्क्रीन कॅप्चर : सध्या विविध कारणांनी आपण आपली स्क्रीन फोटो फाइल म्हणून सेव्ह करत असतो क्रोमनेनेमकी हीच लोकांची सवय हेरली आणि आपल्या ब्राऊजरला फुल स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .आपण जेव्हा प्रिंट स्क्रीन करून फोटो फाइल सेव्ह करतो तेव्हा तो आपल्याला क्रॉप न करता सेव्ह करता येऊशकतो 

सुमो पेंट : कॅप्चर स्क्रीनबरोबरच फोटो सेव्ह करण्यासाठी आणि एडीट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पेंटसारखंच काम करणारं सुमो पेंट नावाचं एक्स्टेन्शन क्रोमने उपलब्ध करून दिलं आहे यामध्ये आपल्या फोटोला विविध लेअर्स देणं फिल्टर्स ब्लर शार्पन बर्न असे विविध इफेक्ट्स देता येऊ शकतात याचबरोबर कर्व्ह कलर बॅलन्सयाही सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत 

ड्रॅग अॅण्ड ड्रॉप सर्च : तुम्ही सातत्याने सर्च करत असलेल्या विविध फाइल्स क्रोम सेव्ह ठेवतो यामुळे आपण थेटत्या सर्च पेजवर जाऊ शकतो याचबरोबर एखादं सर्च आपल्याला नको असेल तर ते आपण याचा वापर करूनड्रॉपही करू शकतो 

अॅडब्लॉक प्लस : सर्च करताना अनेकदा जाहिराती पॉपअप होत असतात हे टाळण्यासाठी अॅडब्लॉक प्लस हेएक्स्टेन्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे यासाठी तुम्हाला एक छोटीशी फाइल इन्स्टॉल करावं लागते .


source :engadget
गूगल क्रोमची किमया गूगल क्रोमची किमया Reviewed by Sooraj Bagal on June 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.