असूसने तैवानमध्ये नवा पॅडफोन लॉंन्च केला आहे. या डिव्हाईसचे नामकरण त्यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्वॉड कोअर स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हीही देणार आहे. याचबरोबर 4.7 इंचीचा अॅड्रायड स्मार्टफोन आहे. जो पॅडफोन- 2 स्टेशनमध्ये बसवल्यानंतर बनतो 10.1 इंचाचा टॅबलेट.
पॅडफोन-2 मध्ये असूसने आधीच्या पॅडफोनपेक्षा चांगल्या फिचर्सचा समावेश केला आहे. 4.3 इंचाच्या मागील पॅडफोनपेक्षा वेगळया डिव्हाईसच्या स्मार्टफोनमध्ये सुपर IPS+ टेक्निकने युक्त 4.7 इंचाची स्क्रीन आहे.
जर तुम्हाला या फोनची स्क्रीन छोटी वाटत असेल तर पॅडफोन स्टेशनबरोबर याला कनेक्ट करा. म्हणजे तुम्हाला मिळेल 10.1 इंचाची स्क्रीन जी 1280x800 रिझोल्यशून इतकी असेल.
पॅडफोन-2 मध्ये अॅड्राएड 4.0 आईस्क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टिमची सुविधा पुरवण्यात आली आहे. मात्र असूसने लवकरच ते जेलीबेनने अपग्रेड करण्यात येणार असल्याचे सांगितले. या डिव्हाईसमध्ये आपल्याला f/2.4 BSI सेन्सरबरोबर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा 1080 पिक्सलवर 30 फ्रेम प्रति सेकंदवर व्हिडिओ शूट करता येऊ शकतो. चॅटिंगसाठी 1.2 मेगापिक्सलचा कॅमेराही देण्यात आला आहे.पॅडफोन-2 चे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे याचे 1.5 GHz चे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एस-4 क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम पुरवण्यात आली आहे. यामुळे या डिव्हाईसचा वेग निश्चितच वाढेल.
या डिव्हाईसमध्ये NFC फिचरही आहे. असूस वेबस्टोअरमध्ये 2 वर्षांसाठी 50 जीबी वेबस्टोरेजची सुविधा आहे. यामध्ये 5,000mAh ची बॅटरी लावण्यात आली आहे.
पॅडफोन-2 चे वजन 649 ग्रॅम आहे. जे आधीच्या मॉडेलपेक्षा कमी आहे. पॅडफोनचे वजन 854 ग्रॅम आहे. तैवानमध्ये या डिव्हाईसची किंमत $620 (32,739) $750 (39,607) रूपये ठेवण्यात आली आहे.
टॅबलेट आणि स्मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2
Reviewed by Sooraj Bagal
on
October 19, 2012
Rating:
No comments: