विंडोजची 'आठवी' खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

विंडोज फोन ८ हे मायक्रोसॉफ्टचं सर्वात प्रसिद्ध आणि प्रगत व्हर्जन. सध्या विंडोज ८ पीसी ओएसच्या बाबतीत जितकी उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता विंडोज फोन ८ या मोबाईल ओएस विषयीसुद्धा दिसून येत आहे. या मोबाईल ओएसमुळे विंडोज फोन्ससाठी अधिक चांगला हार्डवेअर सपोर्ट तयार झाला आहे. या आधीच्या सर्व विंडोज व्हर्जन्समध्ये फक्त सिंगल कोअर प्रोसेसरची क्षमता होती. परंतु विंडोज फोन ८ ओएस असलेल्या डिव्हाइसमध्ये मल्टी कोअर प्रोसेसर सपोर्ट होऊ शकतो. यामुळे तुम्ही विंडोज फोन अधिक चांगल्या व जलद रीतीने ऑपरेट करू शकता. विंडोज फोन ८ मोबाईल ओएस असलेल्या डिव्हाइसमध्ये तुम्हाला मेमरी एक्सपांड करण्याची (मेमरी कार्ड) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विंडोज फोन ८ या ओएसमध्ये १२८० x७२० पिक्सेल रिझोल्युशन आता सपोर्टेड आहे. या ओएसमुळे तुम्हाला विंडोज फोनमध्ये ऑफलाईन मोडवरसुद्धा टर्न बय टर्न डायरेक्शन सहित मॅप्स अॅक्सेस करता येऊ शकतात. यामध्ये विंग सर्च इंजिन तसेच विंग मॅप्स आहेत. 
                             यामध्ये तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर १०चा अनुभव तुमच्या विंडोज फोनवर घेऊ शकता. या इंटरनेट एक्सप्लोरर १० मुळे जलद सर्फिंग करता येईल. तसेच यामध्ये सोशल नेटवर्किंगचे इनबिल्ट पर्याय उपलब्ध आहेत. लॉटमेल विंडोज लाइव्ह मेसेंजर फेसबुक ट्विटर लिंक्डइन याद्वारे तुम्ही अगदी सहजपणे सोशल नेटवर्किंग करू शकता. 
मायक्रोसॉफ्ट उत्पादनांची  नवीन चिन्हे   


                              विंडोज फोन ८ मध्ये पीपल हब हे अॅप अधिक प्रगत आहे. ज्यामुळे स्टेटस पोस्ट ,अपडेटस याद्वारे सोशल नेटवर्किंग जलद करू शकता. तुमची आवडती गाणी आणि मूव्हीजसाठी यामध्ये म्युझिक + व्हिडियो हब उपलबध आहे. यामुळे आवडती गाणी ऐकणं व्हिडिओ पाहणं शेअर करणं या गोष्टी सहज शक्य होईल. या ओएसमधील पिक्चर हब मुळे फोटो शेअरिंग मित्रमैत्रिणींचे ऑनलाईन अल्बम या गोष्टी सहजपणे पाहता येतील. या ओएसमध्ये आऊटलूक मोबाईल हे अॅपही उपलब्ध आहे. ज्यामुळे इमेलचा जलद आणि सहज अनुभव तुम्हाला घेता येईल. विंडोज फोन ८ या मोबाईल ओएसमध्ये तुम्हाला हव्या त्या मूव्हीज रेस्टॉरंटसची माहिती मिळवता येऊ शकते. 
                                 तुमच्या विंडोज फोनची चोरी झाली तर विंडोज फोन डॉट कॉमवर जाऊन फाइंड माय फोन या पर्यायाद्वारे तुम्ही त्यावर कॉल करू शकता किंवा तो लॉक करून त्यातील डेटा डिलीट करू शकता. यातील ऑफिस हब या अॅपद्वारे वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट यांचे मोबाईल व्हर्जन तुम्ही फोनवर मिळवू शकता.  मायक्रोसॉफ्ट एक्सपर्टसनी विंडोज मार्केट प्लसमध्ये एक लाख अॅप्स उपलब्ध करून दिलेत. परंतु अॅपल अॅप्स स्टोर आणि गुगल प्ले स्टोअरच्या तुलनेत ते खूप कमी आहेत. सर्फेस '' या टॅबद्वारे मायक्रोसॉफ्ट लवकरच विंडोज ८ ओएस लाँच करणार आहे. नोकिया ल्युमिआ ९२० आणि ८२० एचटीसी ८ आणि ८.५ सॉमसंग अॅटिव्हएस हे विंडोज फोन ८ ओएस असलेले काही आगामी विंडोज फोन्स आहेत.


---           चैतन्य साळगांवकर

                                  
विंडोजची 'आठवी' खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह विंडोजची 'आठवी' खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह Reviewed by Sooraj Bagal on October 20, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.