फेसबुकचं कव्हर पेज सेट करण्यात सर्वचजण हुश्शार झालेत. पण , फेसबुक सारखेच ट्विटरचेही कव्हर आपल्याला सेट करता येऊ शकतं , याची माहिती फारशा मित्रांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळेच सर्वांच्या अकाऊंटवर केवळ चिमणीच दिसते आणि ट्विट कोणाचं हे शोधण्यासाठी नाव पहावं लागतं. पण आता फारशी माहिती नसलेल्या ट्विटरच्या या सुविधेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रत्येकाच्या अकाऊंटचं कव्हर असलेली ट्विटरची चिमणी आता नाहीशी होऊ लागली आहे. त्याच्या जागी त्यांचे किंवा इतर फोटो दिसू लागले आहेत.
तुम्हालाही तुमच्या ट्विटरचं कव्हर सेट करायचं असेल तर तुमच्या प्रोफाइलच्या सेटिंग्जमध्ये जा. त्यानंतर एडीट प्रोफाइलमध्ये जा त्यात हेडर आणि फोटो असे दोन पर्याय आहेत. यात फोटो म्हणजे तुमचा फोटो आणि हेडर म्हणजे कव्हर. त्या हेडरमध्ये तुम्ही तुमच्या वेबकॅमच्या मदतीने फोटोही काढू शकतात किंवा तुमच्या कम्पुटरमध्ये सेव्ह असलेला फोटोही त्यात अपलोड करू शकता. फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला त्याची स्केल विचारली जाते. कारण त्या स्केलमधील फोटोचं तुमचा हेडर म्हणून दिसणार. एकदा का तुम्ही हेडर सेट केला की तुमचा फोटो ,ट्विटरचा अड्रेस त्या हेडरवर दिसू लागतो. यामुळे तुमच्या प्रोफाइलला एक चांगला लूक येतो. प्रामुख्याने प्रोफेशनल युजर्सनी हा पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे.
तुमच्या ट्विटर अकाऊंटचं डिझाइनही तुम्ही बदलू शकता अगदी जीमेल सारखं. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन डिझाइनमध्ये जावं लागेल. तिथे तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन निवडली की चेंज background मध्ये जायचं. तिथे तुम्ही निवडलेली डिझाइन सेट झाली की तुमचं काम झालं. या डिझाइनसाठी पण तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला एखादा फोटो किंवा डिझाइनही वापरू शकता. ट्विटरच्या या नव्या लूक बद्दल लोकांना अनेक चांगल्या कमेंट्स मिळू लागल्या आहते. यामुळे सर्वांचे सारखेच दिसणाऱ्या ट्विटर अकाऊंटपासून आपल्याला थोडीशी सुटका मिळणार आहे. तसेच फेसबुक , जीमेलबरोबरच ट्विटर अकाऊंटही स्मार्ट होऊ लागणार आहेत.
ट्विटरमध्ये तुम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात माहिती देता येते. त्यासाठी केवळ १४० शब्दात तुम्हाला स्वतःला व्यक्त करावे लागते. ही जागा तुम्हाला कमी पडत असेल तर त्यांना अधिक कल्पना लढविण्यासाठी वाव देऊ नका. त्यांना तुमच्या फेसबुक पेजची किंवा पर्सनल वेबसाइटची लिंक द्या आणि तुमच्याविषयी अधिकाधिक लोकांना जाणून घेऊ द्या. ट्विटरवर विविध ठिकाणांनुसार काही विशिष्ट फिचर्स , ट्रेण्ड येतात. त्यासाठी तुम्हीही तुमचे शहर अॅड करा आणि ट्रेण्डमध्ये सहभागी व्हा.

ट्विटर अकाऊंट करा स्मार्ट
Reviewed by Sooraj Bagal
on
October 15, 2012
Rating:
No comments: