बहुप्रतिक्षीत HTC कंपनीचा हायडेफिनेशन डिस्प्ले असलेला स्मार्टफोन बाजारात लॉंन्च झाला आहे. जपानमध्ये कंपनीने नवा HTC बटरफ्लाई J लॉंन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाचा सुपर LCD 3 डिस्प्ले आहे. जो 1920*1080 पिक्सलचा रिझोल्यूशन देते. हा फोन जपानमध्ये डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहे. मात्र याच्या आंतरराष्ट्रीय लॉंन्चिगची काहीही माहिती मिळू शकलेली नाही. फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊयात या शानदार फोनच्या वैशिष्टयांबाबत...बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमधील हा पहिला संपूर्ण एचडी अनुभव देणारा फोन आहे. याचे खास वैशिष्ट म्हणजे प्रतिइंच स्क्रीनमध्ये 440 पिक्सल आहेत.HTC बटरफ्लाई J मध्ये 1.5 GHz चे क्वालकॉम एस4 प्रो-क्वाडकोअर प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 16 जीबीची इंटर्नल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.यामध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोनमध्ये अॅड्रायड 4.1 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामध्ये HTC Sense 4+ फिचर आहेकनेक्टिविटीसाठी HDMI out, microUSB, WiFi, ब्ल्यूटूथ 4.0 आणि NFC सुद्धा आहे.
जगातील पहिला हायडेफिनेशन स्मार्टफोन लॉंन्च
Reviewed by Sooraj Bagal
on
October 20, 2012
Rating:
No comments: